पावसाळ्यात कपडे, अंतवस्त्र सुकवण्यासाठी काय करावे? हे ५ उपाय तुम्हाला माहित आहेत का?

Manasvi Choudhary

कपडे सुकण्याचा त्रास

पावसाळा हा सर्वांच्या आवडीचा ऋतू आहे. पावासाळ्यात पावसात भिजायला सर्वांनाच आवडते. मात्र पावसाळ्यात सर्वात मोठी अडचण येते ती ओले कपडे.

Clothes Drying Tips

पावसाळ्यात होणाऱ्या समस्या

पावसाळ्यात सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि दमट हवामानामुळे कपडे वेळेवर न सुकण्याचा त्रास असतो.

Clothes Drying Tips

कपडे सुकवण्यासाठी घरगुती उपाय

अनेक महिला पावसाळ्यात घरातच कपडे सुकतात. मात्र कपडे जास्त वेळ ओले राहिले तर त्यात बुरशी, जीवाणू होण्याचा धोका अधिक वाढतो.अशावेळी कपडे वेळेवर सुकण्यासाठी तुम्ही योग्य घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.

Clothes Drying Tips

हीह्युमिडिफायरचा वापर

हवेत आर्द्रता असल्यास कपडे सुकायला वेळ लागते अशावेळी तुम्ही घरात हीह्युमिडिफायर असल्यास त्याचा वापर करा.

Clothes Drying Tips

फॅन सुरू ठेवा

घरात कपडे वाळत घालताना फॅन सुरू ठेवा. कपडे सुकत घालताना पंख्याखाली घाला यामुळे कपडे लवकर सुकतील.

Clothes Drying Tips | Saam Tv

एकमेकांना चिकटून कपडे सुकत घालू नका

एकाच जागी कपड्यांचा ढीग करू नका. कपडे व्यवस्थित वेगवेगळे सुकत घाला. एकमेकांना चिकटून कपडे सुकत घातले तर हवा कपड्यांना व्यवस्थित लागत नाही.

Clothes Drying Tips

खेळत्या हवेत कपडे सुकत घाला

घरामध्ये कपडे खिडकीजवळ, गॅलरीमध्ये सुकत घाला. जेथे हवा खेळती राहते अश्या ठिकाणी कपडे सुकत घाला म्हणजे कपड्यांना कुबट वास येणार नाही.

Clothes Drying Tips | google

कपडे धुण्याचे योग्य नियोजन करा

जाड ब्लॅकेट, चादरी सुकण्यासाठी अधिक वेळ लागतो. अशावेळी पावसाचा अंदाज घेऊन तु्म्ही कपडे धुण्याचे नियोजन करा.

Clothes Drying Tips | pinterest

ह्रँगरवर कपडे सुकत घाला

शर्ट, टी- शर्ट, कुर्ते किंवा ड्रेस हँगरवर टांगून सुकायला लावल्यास फायदा होईल. कपडे लवकर सुकतात.

Clothes Drying Tips | GOOGLE

next: पावसाळ्यात ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी कॉटन-जॉर्जेटच्या 'या' 5 साड्या ठरतील बेस्ट

Cotton And Georgette Saree Patterns
येथे क्लिक करा...