Woman Ends Life After Years of Abuse Saam Tv Marathi
देश विदेश

बड्या उद्योगपतीच्या सुनेनं आयुष्य संपवलं; गर्भवती असताना पहिल्या मजल्यावरून ओढलं अन्.., माहेरच्यांचा गंभीर आरोप

Woman Ends Life After Years of Abuse: दिल्लीच्या वसंत विहारमध्ये उद्योगपतीच्या सुनेनं आत्महत्या केली. मृत महिलेच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

दिल्लीतील वसंत विहार येथील एका उद्योगपतीच्या सुनेच्या कथित आत्महत्येप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीनुसार एफआयआर दाखल केला आहे. 'सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ', असा थेट आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या आईने या प्रकरणात सीबीआयची चौकशीची मागणी केली आहे.

एफआयआरनुसार, महिलेला गेल्या काही वर्षांत तिच्या वैवाहिक आयुष्यात हिसांचार आणि अपमान सहन करावा लागला होता. यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचललं. मृत महिलेच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, 'फेब्रुवारी - मार्च २०११ साली, पती आणि सासूने तिला घराच्या पहिल्या मजल्यावरून ओढून नेले. तसेच गर्भवती असताना तिच्यावर अत्याचार केला', असा आरोप मृत महिलेच्या आईनं केला.

पीडित महिलेनं तिच्या आईला याबाबत माहिती दिल्यानंतर, कुटुंब दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, सासरच्या मंडळींनी तेव्हा माफी मागितली. तसेच पुन्हा असे वर्तन होणार नाही, असे सांगितले. मुलाच्या जन्मानंतर पीडित महिलेला पतीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली. तेव्हा पीडित महिला आपल्या बाळासोबत माहेरी निघून गेली. वर्षभरानंतर सासरच्यांनी महिलेला सासरी नेली.

मृत महिलेच्या आईने आरोप केला की, मुलीला वारंवार वाईट वागणूक देण्यात आली. तिला फोन वापरण्यासही बंदी घालण्यात आली. याच त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं, असा आरोप मृत महिलेच्या घरच्यांनी केला. दुपारी १२ च्या सुमारास, कुटुंबाला फोन आला. महिलेला रूग्णालयात नेण्यात आले आहे. तिचा मृत्यू झाला आहे, असं सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Migraine Pain: मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी 'या' सवयींचे पालन करणं अत्यंत महत्वाचं

Diabetes Bad Habits: डायबेटिसचा त्रास आहे? ही १ वाईट सवय झटक्यात वाढवते ब्लड शूगर लेव्हल, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

Maharashtra Politics: अजित पवारांची धक्का एक्स्प्रेसस सुसाट! बड्या नेत्यांनी हाती बांधले घडयाळ

Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभूच्या हाउंडस्टूथ प्रिंट सिल्क साडीने वेधले नेटकऱ्यांचं लक्ष, पाहा ग्लॅमरस फोटो

Maharashtra Live News Update: यवतमाळ पालिकेत भाजपचा बंडखोर विजयी

SCROLL FOR NEXT