Delhi Police intensify security after foiling a major terror plot and arresting nine ISI-linked suspects. saam tv
देश विदेश

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISI चे ९ संशयित दहशतवादी ताब्यात

Delhi Police Foils ISI Terror Plot Latest News: दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी कट उधळण्यात यश आले असून आयएसआयशी संबंधित ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. पाकिस्तानी आयएसआय (ISI) आणि मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांच्या सांगण्यावरून काम करणाऱ्या नऊ संशयितांना एनडीआरने अटक केली आहे. या व्यक्तिंना दिल्लीतील प्रमुख ठिकाणांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे काम सोपवण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सांगितले की, आयएसआय (ISI) आणि गुन्हेगारीच्या टोळ्यांशी संबंधित नऊ जणांना दिल्लीतील विविध ठिकाणी हल्ले करण्याचे काम सोपवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक मोहीम राबवण्यात आली, ज्यामुळे आरोपींना अटक करण्यात आली. या मॉड्यूलवर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून होते.

अटक करण्यात आलेले नऊ सदस्य हे पाकिस्तानी गुप्तचर संस्था, इंटर-सर्व्हिसेस इंटेलीजन्स आणि मुंबईतील काही गुन्हेगारांशी संबंधित असलेल्या सूत्रधारांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप आहे. त्यांना दिल्लीतील संवेदनशील भागांवर हल्ले करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अटक केलेले आरोप दिल्ली, मुंबई आणि पंजाबचे असून त्यापैकी काही परदेशी नागरिक आहेत.

दिल्लीत हाय अलर्ट जारी

गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा अहवाल दिल्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मध्य दिल्लीतील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांना लक्ष्य करू शकतात. ते आत्मघाती हल्ले, वाहनांमध्ये आयडी, गोळीबार किंवा मोठ्या हल्ल्यांची योजना आखत होते. तेव्हापासून दिल्ली पोलीस या गटावर लक्ष ठेवून आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्लीतील सर्व पोलीस स्टेशनमधील आणि जिल्ह्यांमधील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्यांना गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या समन्वयाने काम करण्यास सांगण्यात आले आहे.

परदेशात बसून हल्ल्याचा कट कोण रचत आहे?

दिल्ली पोलीस या नेटवर्कबद्दल संपूर्ण माहिती गोळा करण्यात आणि त्यात सामील असेलल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहे. तसेच एवढ्या प्रमाणात स्फोटके कुठून आली याचाही तपास करत आहेत. या टोळीचे बाहेरील देशाशी असलेले संबंध कोणाशी आहे आणि हल्ल्यांसाठी आर्थिक रसद कोण पुरवत आहे, परदेशातील कोण लोक यामध्ये सामील आहे याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत एक हजार दोनशे एकरमधील सव्वा लाख झाडांची कत्तल

Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश

LPG Rules : एक घर, एक गॅस कनेक्शन... 1 जूनपासून LPG च्या नियमात होणार ५ महत्त्वाचे बदल

Batatyacha Pancake: नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

SCROLL FOR NEXT