Narendra Modi News  Saam tv
देश विदेश

'एकालाही सोडणार नाही, सखोल तपास होणार' दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi speech after Delhi bomb blast: दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात चारचाकीमध्ये बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली.

Bhagyashree Kamble

  • दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ चारचाकीमध्ये स्फोट

  • १२ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

  • बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत नरेंद्र मोदी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे

देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटामुळे हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी स्फोट झाला. या भीषण स्फोटात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा सध्या एएनआयकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या भीषण स्फोटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान 'या षडयंत्राचा सखोल तपास होणार. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही', अशा तीव्र शब्दांत हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी उपस्थितीतांना संबोधित करताना दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणाबाबत भाष्य केलं. 'दिल्ली लाल किल्ल्यावर घडलेला बॉम्बस्फोट भीषण होता. हे प्रकरण समोर येताच तपासाला सुरूवात झाली. आपले तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करेल', असं मोदी म्हणाले.

'या षडयंत्राचा सखोल तपास होणार. या बॉम्बस्फोट हल्ल्यामागे जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही', असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय. 'दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषींवर कडक कारवाई करणार', असंही नरेंद्र मोदी म्हणाले. 'मी पीडित लोकांच्या भावना समजू शकतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी काल रात्रभर या घटनेच्या तपास यंत्रणेच्या संपर्कात होतो', असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, हा हल्ला नक्की का घडवून आणाला? बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागचं कारण काय? याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, दिल्ली बॉम्बस्फोट हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मृतांचा आकडा हा १२ वर गेला आहे. तर, अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

मतदान केंद्रातून भाजपच्या उमेदवाराला बाहेर काढले; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा | VIDEO

Mumbai Bullet Train : ...तर मुंबईतील बुलेट ट्रेनचं काम बंद होणार?, BMC ॲक्शन मोडवर, तीन दिवसांत उत्तर मागितलं

भाजप - अजित पवार गटातील बड्या नेत्यांचे पुतणे भिडले, बीडच्या गेवराईत तणावपूर्ण वातावरण, नेमकं घडलं काय?

Devendra Fadnavis: 'होय आमच्यात मतभेद, पण...', एकनाथ शिंदेंसोबतच्या रूसव्या -फुगव्यांवर मुख्यमंत्री स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT