Delhi Swaroop Nagar teenage girl gang rape murder case : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे. येथील स्वरूप नगर परिसरात अल्पवयीन मुलांनी बलात्कार करून तरूणीसोबत भयंकर कृत्य केल्याची धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. तरुणीवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. या प्रकरणात तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह चार आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वरूप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. आरोपींनी तरुणीला गाठून सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाच्या उद्देशाने व पकडले जाण्याच्या भीतीपोटी तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास यंत्रणा वेगाने हलवली.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये मुख्य आरोपींसह काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या घटनेमागील इतर सर्व बाबींचा सखोल तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी दोन चाकू, गुन्ह्याच्या वेळी घातलेले कपडे आणि टेम्पो जप्त केला. सुरुवातीला मृतदेह महिलेचा असल्याचे ओळख पटली होती, परंतु नंतर मृत व्यक्ती अल्पवयीन असल्याचे उघड झाले. अतिरिक्त पोलीस उपआयुक्त लोकेश वरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळाजवळ एका संशयास्पद टेम्पोची हालचाल दिसून आली. अंधारामुळे त्याचा नंबर प्लेट स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचा मार्ग शोधण्यासाठी वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमधील फुटेज एकत्र केले.
१५ सप्टेंबरच्या रात्री, खड्डा कॉलनीमध्ये एक टेम्पो उभा असलेला आढळला. पोलिसांनी चालकाची ओळख पटवून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चार आरोपींना अटक केली. आरोपींपैकी एक जण त्या किशोरवयीन मुलीचा कथित प्रियकर होता आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांसोबत दारू प्यायली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.