DELHI ROHINI BUILDING COLLAPSE: THREE DEAD AFTER NEWLY CONSTRUCTED FOUR-STOREY BUILDING CRASHES AMID HEAVY RAIN Saam Tv
देश विदेश

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Delhi Building Collapsed Update : दिल्लीतील रोहिणी सेक्टर-१६ येथे मुसळधार पावसादरम्यान नव्याने बांधलेली चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू असून आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील रोहिणी सेक्टर-१६ येथे नव्याने बांधलेली चार मजली इमारत अचानक कोसळली

  • दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एकाची सुखरूप सुटका करण्यात आली

  • मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

  • पुढील बचावकार्य सुरु

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये इमारत कोसळून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली २१ कामगार अडकल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रोहिणी परिसरात नव्याने बांधलेली चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना रोहिणी सेक्टर-१६ मधील जी-४ पॉकेट परिसरात बुधवारी दुपारी सुमारे ४.२८ वाजता घडली. केएनके मार्ग पोलीस ठाण्याजवळची इमारत कोसळल्याची माहिती मिळाली आणि एकच खळबळ उडाली. आणखी काही जण अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत गेले २ ते ३ दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज देखील हवामान विभागाने दिल्लीला रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पडलेल्या पावसाने नागरिकांची दैना केली आहे. बुधवारी ४ च्या सुमारास रोहिणी सेक्टर-१६ मधील जी-४ पॉकेट परिसरात केएनके मार्ग पोलीस ठाण्याजवळची अलीकडेच नव्याने बांधण्यात आलेली इमारत अचानक जमीनदोस्त झाली.माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. तेव्हा जी-४/१५१-१५२ येथील नव्याने बांधलेली चार मजली इमारत पूर्णपणे कोसळून तिचा मोठा ढिगारा रस्त्यावर पसरल्याचे आढळून आले. स्थानिक नागरिकांनी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती दिल्यानंतर बचावकार्याला वेग देण्यात आला.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस), टीपीडीडीएल तसेच इतर यंत्रणांना पाचारण करण्यात आले. ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून तातडीने बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात राम किशन यांचा मुलगा राम (४२) याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर बचावकार्यादरम्यान आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये राम दुआ (६२) आणि काफे उर्फ नुरुल (२४) यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, सद्दाम उर्फ रवी (३२) याला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

बचाव मोहिमेदरम्यान पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका नागरिकाशी संपर्क साधला होता. त्याला सुरुवातीला पाणी पुरवण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जवळच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून त्या व्यक्तीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला. या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात मदत झाली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT