delhi blast  Saam tv
देश विदेश

Delhi Blast : दिल्लीवर दहशतवादी हल्ला? २ संशयित ताब्यात, चौकशी सुरु

Delhi Blast update : दिल्लीवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. या स्फोटाप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे .

Vishal Gangurde

दिल्लीवर दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली आहे

दिल्लीतील स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे

दिल्लीतील स्फोटात ३० हून अधिक जखमी झाले आहेत

स्फोटानंतर दिल्ली पोलीस अलर्ट झाले आहेत

दिल्लीतील स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भीषण स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी काही भागात छापे देखील टाकले आहेत.

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याजवळील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. या कॅमेरात संशयित हालचाली करताना दिसणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लाल किल्ल्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरा हा उच्च रिझोल्यूशनचा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी करण्यात येत आहे.

दिल्लीतील या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीसहित देशभरातील शहरातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांच्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी एक वाहन सिग्नलवर थांबलं. त्याचवेळी त्या वाहनाचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तीशाली होता की आजूबाजूच्या वाहनांचंही नुकसान झालं. सर्व यंत्रणा, एफएसएल, एनआयए घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटात काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही फोन आला होता. वेळोवेळी त्यांना घटना आणि आताच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली जात आहे.

तत्पूर्वी, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. एनएसजी, एनआयए आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. दिल्लीच्या स्फोटाच्या घटनेनंतर गृहमंत्री हे गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांच्या सातत्यानं संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या स्फोटाच्या घटनेनंतर तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्याकडून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT