ED Raid On aap MLA  Saam Tv
देश विदेश

ED Raid : 'आप'चा आणखी एक बडा नेता ईडीच्या जाळ्यात; काय आहे घोटाळा?

ED Raid On aap MLA Amantullah Khan : ईडीने आज आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकलाय. त्यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : दिल्ली वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणी ईडीच्या पथकाने मोठी कारवाई केलीय. ईडीने आज २ सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केलीय. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. अमानतुल्ला खान यांना ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

आप आमदाराच्या घरावर ईडीची छापेमारी

ईडीचे पथक आज सकाळी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. अमानतुल्ला यांनी सुरुवातीला ईडीच्या टीमला घरात जाऊ दिलं नाही. त्यामुळे मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाला (Delhi News) होता. सकाळी आठ वाजता ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. जामिया नगरचे स्थानिक पोलीस स्टेशनचे एसएचओ नरपाल सिंग यांनी अमानतुल्ला खान यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता.

अटक केली

अमानतुल्ला खान दिल्लीच्या ओखला मतदारसंघामधून आमदार आहेत. दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून जवळच्या व्यक्तींच्या नियुक्त्या केल्याचा आरोप खान यांच्यावर आहे. या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत (ED Raid On aap MLA) असताना ईडीचे पथक आज सकाळी अमानतुल्ला यांच्या घरी पोहोचले होते. ईडी टीम आणि अमानतुल्ला यांच्यात काही काळ वाद झाल्याचं देखील समोर आलंय. अनेक तास छापेमारी केल्यानंतर ईडीने अमानतुल्ला यांना अटक केलीय.

दिल्लीचा वक्फ घोटाळा काय आहे ?

नोव्हेंबर २०१६ मध्ये दिल्ली सरकारच्या महसूल विभागाचे एसडीएम यांनी वक्फ बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष अमानतुल्ला खान (AAP MLA Smantullah Khan)यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये अमानतुल्ला खान यांनी वक्फ बोर्डाच्या अनेक मंजूर आणि गैर-मंजूर पदांवर बेकायदेशीर नियुक्त्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. अमानतुल्ला यांनी एकूण ३२ जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप केला गेलाय.

अमानतुल्ला खान यांच्यावर आरोप काय?

दिल्ली वक्फ बोर्डात अमानतुल्ला यांनी बेकायदेशीर नियुक्त्या करून (delhi waqf board corruption) पैसे उकळले, असा ईडीने आरोप केलाय. ईडीने आरोप केलाय की अध्यक्ष असताना अमानतुल्ला खान यांनी शंभर कोटी रुपयांची वक्फ मालमत्ता बेकायदेशीरपणे लीजवर दिली होती. त्यांनी बेकायदेशीरपणे वक्फ बोर्डामध्ये ३२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT