Delhi Mumbai Expressway Vallabh Maheshwari Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : महामार्गावर बिझनेसमेनचा अपघाती मृत्यू; व्यावसायिक क्षेत्रात शोककळा

Delhi Mumbai Expressway Vallabh Maheshwari Accident News : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अलवरजवळ भीषण अपघातात व्यवसायिक वल्लभ महेश्वरी यांचा मृत्यू. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली असून चालक मात्र बचावला आहे.

Alisha Khedekar

  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अलवरजवळ भीषण अपघात

  • शकुन ग्रुपचे MD वल्लभ महेश्वरी यांचा मृत्यू

  • कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

  • चालक सुदैवाने बचावला

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला. या अपघातात राजस्थानमधील प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ महेश्वरी यांचा मृत्यू झाला. हा अपघात राजस्थानमधील अलवर शहराजवळ बीएमडब्ल्यू कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शकुन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (MD) वल्लभ महेश्वरी हे रविवारी जयपूरहून मथुराकडे जात होते. त्यावेळी अलवर जिल्ह्यातील रेणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचा ताबा सुटला.

त्यानंतर, गाडीने रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडत मधल्या डिव्हायडरला धडक दिली आणि पुढे जाऊन पुलाच्या भिंतीवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर महेश्वरी आणि चालकाला तातडीने पिनान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अलवर येथील हरिश रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान महेश्वरी यांना मृत घोषित केले. या अपघातात चालक सुदैवाने वाचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वल्लभ महेश्वरी हे जयपूरस्थित शकुन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या उद्योगसमूहाने जाहिरात, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. व्यवसाय व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांना ३२ वर्षांहून अधिक अनुभव होता. एसजीएम बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, शकुन कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड , शकुन अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि मनोकामना रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवडी

Kidney Health: किडन्या खराब होऊ नयेत म्हणून आत्ताच जीवनशैलीत करा हे 7 बदल

Khana Saree Design: लग्नात नेसण्यासाठी पाहा या 7 ट्रेंडी आणि बजेटमध्ये असलेले सुंदर खणाच्या साड्या

Night Sweating Causes: रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम का येतो?

Couple Ring Designs : 'कपल रिंग'च्या आकर्षक डिझाइन्स, तुमचा रोमँटिक अंदाज पाहून बायको होईल खुश

SCROLL FOR NEXT