Delhi Mayor Election
Delhi Mayor Election Saam Tv
देश विदेश

Delhi Mayor Election : दिल्ली महापालिकेत मोठा गोंधळ, भाजप अन् आप नगरसेवकांमध्ये राडा

वृत्तसंस्था

Delhi Mayor Election : दिल्लीत MCD निवडणुकीनंतर आज म्हणजेच 6 जानेवारी 2023 रोजी महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांचीही निवड होणार आहे. मतदानापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. मात्र त्यापूर्वीच आपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापौरांव्यतिरिक्त उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 6 सदस्यांचीही आज निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशित सदस्यांना पहिल्या शपथविधीला नगरसेवक विरोध करत आहात. आम आदमी पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून एलजीने नियुक्ती करण्यास आक्षेप घेतला. दुसरीकडे, काँग्रेसने या निवडणुकीत मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

महापौर कोण होणार ?

दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाने भाजपचा पराभव करत विजय मिळवला होता. आपने शैली ओबराय यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे, तर उपमहापौर पदाची उमेदवारी मोहम्मद इकबाल यांना दिली आहे.

आज सर्वप्रथम सर्व नगरसेवकांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल. त्यानंतर महापौर पदासह उपमहापौर आणि ६ स्थायी समितीच्या ६ सदस्याची निवड केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या राज्यपालांनी सत्य शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणूकीत आपने १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला होता.

भाजपने निवडणूकीत रंग भरला…

भाजपने महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार दिल्याने निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. भाजप ऐन वेळी काही करू शकते. या भीतीने आप बहुमत असूनही जपून पावलं टाकत आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपचे २ सदस्य सहज निवडून येतील मात्र, भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने भाजप काही चमत्कार घडून आणेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT