देश विदेश

Delhi New : दिल्ली पुन्हा हादरली! तरुणाला कारच्या बोनटवरून अर्धा किलोमीटर फरफटत नेले; VIDEO

Viral Video : कारच्या बोनटवरून तरुणाला जवळपास अर्धा किलोमीटर फरफटत नेले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Nandkumar Joshi

Delhi Latest News Video Viral : संपूर्ण देश दिल्लीतील कंझावालातील अपघाताची घटना अजून विसरलेला नाही, तीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका कारचालकानं तरुणाला धडक दिली. त्यानंतर कारच्या बोनटवरून जवळपास अर्धा किलोमीटर फरफटत नेले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात १२ जानेवारी रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्यात येत असून, चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रिपोर्ट्सनुसार, हॉर्न वाजवल्यावरून बाचाबाची झाली आणि नंतर कारचालक तरुणाने दुसऱ्या तरुणाला धडक दिली. त्यामुळे तो तरूण जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनटवर बसला. कारमधील तरुणाने बोनटवरून त्याला उतरवण्याऐवजी जवळपास अर्धा किलोमीटर फरफटत नेले.

थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

तरुणाला कारच्या बोनटवरून अर्धा किलोमीटर फरफटत नेत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कारच्या बोनटवर एक तरूण दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोनटवर फरफटत नेलेल्या तरुणाचा जीव कसाबसा वाचला. जमिनीवर कोसळल्याने तो जखमी झाला आहे.

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली जात आहे. कारच्या क्रमांकावरून आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तर पीडित तरुणावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमित ठाकरेंना पोलिसांची नोटीस; शिवाजी पुतळा अनावरणाचा वाद चिघळला|VIDEO

Batata Rassa Recipe: गावरान पद्धतीचा झणझणीत बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा?

Maharashtra Politics: निवडणुकांच्या आधी राज्यात नवी घडामोड! ठाकरेंप्रमाणे राजकारणात आणखी दोन बंधू येणार एकत्र

Maharashtra Live News Update: तुळजापुर नगरपरिषदेत भाजपने खाते उघडले, डॉ.अनुजा अजित कदम परमेश्वर यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड

कुख्याला लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला मुसक्या बांधून भारतात आणलं; अनमोल बाबा सिद्दिकी हत्याकांडातील आरोपी

SCROLL FOR NEXT