Delhi Liquor Policy Case Arvind Kejriwal :
दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या आरोपांवर आपले उत्तर सादर केले. कोर्टात ईडीने सादर केलेल्या चारही साक्षीदार भाजपशी संबंधित असल्याचं उत्तर केजरीवाल यांनी दिलंय.
भाजपचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवासन रेड्डी, दारू घोटाळ्यात भाजपला ६० कोटी रुपयांची देणगी देणारे शरथ रेड्डी, गोव्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सीएम प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय सत्य विजय आणि सीएम सावंत यांच्या प्रचारात सहभागी झालेल्या व्यवस्थापकाला साक्षीदार म्हणून हजर करण्यात आले आहे. या चौघांच्या जबाबाच्या आधारेच आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.
यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी ईडीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रानुसार, अरविंद केजरीवाल यांना ९ समन्स देण्यात आल्या होत्या. त्या त्यांना मिळाल्या तरीही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यांनी समन्सला योग्य प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना अटक करावी लागले, असं ईडीने म्हटलंय. तसेच केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका तथ्यहीन असून ही याचिका फेटाळून लावावी, असं ईडीने म्हटलं होतं. अटकेची कारणे विविध न्यायालयात तपासण्यात आलीत.
दरम्यान ईडी हे खोटे बोलण्याचे मशीन बनलं असल्याचा आरोप 'आप' कडून करण्यात आलाय. तपास यंत्रणेने आपल्या प्रतिज्ञापत्रात असेही म्हटलं की, केजरीवाल यांच्याकडे काही पुरावे आहेत, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आलीय. या गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करणं हे पूर्णपणे संवैधानिक आहे. आमच्यासाठी मोठा नेता असो वा सामान्य माणूस, सर्व समान आहेत.केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत तर त्यांना अटक करता येणार नाही, हा त्यांचा दावा आधारहीन असल्याचं ईडीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दारू घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. अटकेनंतर केजरीवाल यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु ईडीकडे असलेले पुरेसे पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.