Delhi Liquor Policy Saam Digital
देश विदेश

Delhi Liquor Policy: दिल्ली मद्यधोरण; संजय सिंग यांच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केले ६० पानी आरोपपत्र

Delhi Liquor Policy: मद्यधोरण प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे आमदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे.

Sandeep Gawade

Delhi Liquor Policy

मद्यधोरण प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे आमदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने त्यांच्याविरोधात राऊस एव्हेन्यू कोर्टात ६० पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.

संजय सिंग यांना ४ ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या रद्द करण्यात आलेल्या मद्य धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यात संजय सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या धोरणामुळे मद्य उत्पादक, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी याचा फायता झाला होता, असा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र संजय सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान संजय सिंह यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने ईडीला ६ डिसेंबर पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला नोटीस बजावली होती. संजय सिंह यांना तुरुंगात ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही, असा दावा करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयाच्या मुदतीपूर्वीच ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १२ वर्षांपूर्वीचे नियम केले पुन्हा लागू; पेन्शन वाढण्याची शक्यता

Pregnancy infections: गर्भधारणेत संसर्ग टाळायचा? आई-बाळाच्या सुरक्षिततेसाठी जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंचा धक्कादायक निर्णय; सोडली तीन खात्यांची धुरा|VIDEO

Arbaaz Khan : मोजके सिनेमे करूनही अरबाज खान मालामाल; मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट, सलमानच्या भावाचा स्वॅगच भारी

SCROLL FOR NEXT