Delhi Hotel Fire saam tv
देश विदेश

Delhi Fire : हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले अन् काळानं झडप घातली; चार्टर्ड अकाउंटंट विवेकसह कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू

delhi hotel fire kills eight members of one family: दिल्लीच्या मालवीय नगरात हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुरुग्राममधून दिल्लीत आलेल्या एकाच कुटुंबातील आठ जणांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

Saam Tv

दिल्ली येथील मालवीय नगरात बुधवारी एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. यात विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तर २०-२५ नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. गुरुग्राममधील एकाच कुटुंबातील आठ जण देखील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. ते मॅक्स हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्याला भेटण्यासाठी गुरुग्रामहून दिल्लीत आले होते.

आगीच्या दुर्घटनेनंतर हॉटेलमध्ये थांबलेल्या नागरिकांचे सर्व नातेवाईक मॅक्स हॉस्पिटलसमोर आले होते. या हॉस्पिटलमध्ये एकूण ३९ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील १८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दिल्लीतील प्रेम बन्सल हे देखील त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत त्यांची मुलगी, जावई आणि त्यांच्या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. बन्सल यांचे जावई विवेक अग्रवाल हे गुरुग्राममधील सेक्टर ४६ मध्ये राहत होते.

'हिंदुस्तान'च्या वृत्तानुसार, पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले विवेक अग्रवाल हे सेक्टर ४६ मध्ये पत्नी तर्जनी, आई प्रेमलता, वडील राधेश्याम, मुलगी जीविशा आणि वारिया यांच्यासोबत राहत होते. विवेक यांचे वडील राधेश्याम यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीत मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी विवेकचे मावशी आणि काका बुधवारी दिल्लीत आले होते. त्यानंतर विवेक सकाळी साडेआठ वाजता सर्वांना घेऊन हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी घेऊन गेला होता. त्या हॉटेलला लागलेल्या आगीत सर्वांचा मृत्यू झाला.

विवेक अग्रवालसोबत त्याची पत्नी तर्जनी, २ मुली, आई, मावशी, काका आणि कुटुंबातील अन्य सदस्यही होता. या सर्वांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेनं रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विवेकच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापूरच्या गाव तलावात घाणीचं साम्राज्य

ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते का? काय आहेत कारणं?

लग्न लावून देत नाही म्हणून पोटच्या मुलाने केली बाप आणि सख्या भावाची निर्घृण हत्या

Akola News: अकोल्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द

राजकारणात मोठा उलटफेर; ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, पक्षातील ५८ आमदार फुटले

SCROLL FOR NEXT