Pooja Khedkar Saam Digital
देश विदेश

Pooja Khedkar Case : पूजा खेडकरने कोर्टात खोटी माहिती दिली; हायकोर्टात सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? वाचा

Pooja Khedkar Case : पूजा खेडकरने कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप हायकोर्टात कोर्टाने दिली आहे. हायकोर्टात सुनावणी यूपीएससीच्या वकिलांनी केला आहे.

Prasad Jagtap

नवी दिल्ली : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर चांगलीच चर्चेत आहे. वाद्रग्रस्त पूजा खेडकरला केंद्र सरकाराने प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलं आहे. याच पूजा खेडकरविरोधात कोर्टात केंद्रीय लोकसेवा आयोगाने गंभीर आरोप केला आहे. पूजा खेडकरने कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप केंद्रीय लोकसेवा आयोगानं केला आहे. दिल्ली हायकोर्टातील सुनावणीदरम्यान युपीएससीच्या वकिलांनी हा आरोप केला आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. यूपीएसी परिक्षेत ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा गैरवापर केल्याचा खेडकरवर आरोप आहे. परिक्षा देताना तिने अनेकदा नावात बदल केल्याचा तिच्यावर ठपका आहे. या प्रकारानंतर तिच्या विरोधात गुन्हा देखील झाला आहे. तर आयोगाने तिची उमेदवारी देखील रद्द झाली आहे.

पूजा खेडकर कोर्टात खोटं बोलत असल्याचा आरोप युपीएससीचा आहे. ३१ जुलै रोजी युपीएससीने पत्रक काढून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. शिवाय भविष्यात कोणतीही परिक्षा देता येणार नसल्याचे ईमेलमधून कळवले होते. परंतु तो ई मेल मिळाला नसल्याचा दावा पूजा खेडकरने कोर्टात केला होता. यावर येत्या तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश पूजा खेडकरला हायकोर्टानं दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे.

आयोगाच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

यूपीएससीतर्फे नरेश कौशिक यांनी युक्तीवाद केला. पूजा खेडकरनं खोटी साक्ष दिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातील आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

पूजा खेडकरने काय म्हटलं होतं?

पूजा खेडकरने कोर्टात दावा केला होता की, 'परीक्षेत नावात कोणताही फेरफार केला नाही. कोणतीही चुकीची माहिती दिली नाही'. दरम्यान, पूजा खेडकरवर स्वत:चे नाव, पालकांचे नाव, फोटो, स्वाक्षरी,ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून खोटी ओळख निर्माण करून परीक्षेला बसली. यानंतर यूपीएसएसीनंतर केंद्र सरकारनेही तिच्यावर मोठी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे–सातारा महामार्गावर डंपरनं ४-५ वाहनांना उडवलं

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाई करणार

Ajit Pawar Plane Crash: दादांच्या विमानाचा पायलट 'सुसाईड बॉम्बर'? रोहित पवारांनंतर अमोल मिटकरींचाही वैमानिकावर संशय

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT