Delhi Chief Minister Saam Tv
देश विदेश

Delhi Chief Minister : दिल्लीत कधी होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? वाचा

Delhi Election Result 2025 : दिल्लीत तब्बल २७ वर्षांनी भाजपचे कमळ फुलले. या ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Delhi Chief Minister : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला. तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपने सत्ता मिळवली. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ४८ जागांवर भाजपचे उमेदवार निवडणून आले. या निमित्ताने काल दिल्लीत भाजपने मोठा जल्लोष केला. दिल्लीचा गड जिंकल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु झाल्या.

दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्ली मुख्यमंत्रीपदाशी संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जेपी नड्डा, बीएल संतोष, बैजयंत पांडा असे भाजपचे अनेक वरिष्ठ नेते हजर होते. या बैठकीमध्ये दिल्ली मुख्यमंत्रीच्या शपथविधी समारोहाबाबत निर्णय घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरुन भारतात परत आल्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न होईल. मोदी १४ फेब्रुवारीला भारतात परतणार आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हा भव्यदिव्य शपथविधी कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलवण्यात येईल असे बैठकीत ठरले आहे.

दरम्यान दिल्ली मुख्यमंत्रीपदासंदर्भात परवेश सिंह वर्मा, सतीश उपाध्याय, विजेंद्र गुप्ता, रेखा गुप्ता आणि आशीष सूद या पाच उमेदवारांची नावे समोर येत आहेत. तरी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत घोषणा करतील असे म्हटले जात आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. तर काल ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी ४८ अशा सर्वाधिक जागांवर भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. या विजयाची टक्केवारी ४५.५६ टक्के आहे. भाजपच्या विजयाने आपचा दिल्लीमध्ये पाडाव झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT