Delhi Rape case saam tv
देश विदेश

संतापजनक! तरुणीला घरी बोलावून घेतलं; बायकोसमोरच नवऱ्यानं केलं धक्कादायक कृत्य

जयप्रकाश असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

दिल्ली : देशात महिला (Women) अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचारविरोधात सरकारने आक्रमक पाऊल उचलावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहेत. अशातच दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक घटना उघडकीस आली. दिल्लीत एका चप्पल कंपनीच्या मॅनेजरने एका तरुणीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा मॅनेजर तरुणीवर बलात्कार करत होता. तेव्हा त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली. (Delhi Crime News)

याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मॅनेजरला अटक केली असून त्याची पत्नी फरार झाली आहे. जयप्रकाश असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात काम करते. आरोपी जयप्रकाश हा त्याच कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे.

15 जुलै रोजी आरोपी जयप्रकाश याने माझी बायको आजारी आहे असं म्हणत पीडित तरुणीला घरी बोलावून घेतलं. घरी गेल्यानंतर त्यांच्या बायकोने तरुणीला एका रुममध्ये नेलं. त्यानंतर आरोपी जयप्रकाश याने तरुणीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपी तरुणीवर बलात्कार करत होता. तेव्हा त्याची बायको त्याला साथ देत होती. असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. (Delhi Todays News)

दरम्यान, बलात्कारानंतर आरोपी जयप्रकाश याच्या पत्नीने पीडितेला नशेचं द्रव्य पाजलं. त्यानंतर आरोपीने पीडितेला तिला तिच्या घरासमोर नेऊन सोडलं. पीडिता आपल्या घरात गेल्यानंतर बेशुद्ध झाली होती. दरम्यान, पीडितेच्या भावाने तिची विचारपूस केली असता. तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या भावाने तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.

बेशुद्ध अवस्थेत पीडितेला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणी बेशुद्ध अवस्थेत असल्यानं तिला काहीच बोलता येत नव्हतं. ती शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी 16 जुलैला या पीडितेचा जबाब नोंदवला आणि बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला. या पीडितेने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT