Delhi Five Death In Same Family: Saamtv
देश विदेश

Delhi Crime: बुऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती! चार मुलींसह वडिलांनी आयुष्य संपवलं; ५ जणांच्या आत्महत्येने दिल्ली हादरली

Delhi Five Death In Same Family: हिरालाल यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना आधी वाटले हे लोक गावी गेले आहेत, पण घरातून दुर्गंधी आल्याने त्यांना संशय आला. ज्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २८ सप्टेंबर

Father Ended Life With 4 Daughter: वडिलांनी आपल्या चार मुलींसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजधानी दिल्लीमधून समोर आली आहे. दिल्लीच्या संत कुंज येथील रंगपुरी गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलींच्या आईचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला होता. वडील कर्करोगाने त्रस्त होते, त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय हिरालाल हे मूळचे बिहारचा असून, वसंत कुंजच्या रंगपुरी भागात भाड्याच्या घरात कुटुंबासह राहत होता. त्यांना 18 वर्षांची नीतू, 15 वर्षांची निशी, 10 वर्षांची नीरू आणि 8 वर्षांची निधी अशा चार मुली होत्या. हिरालाल हे सुतारकाम करायचे. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी कर्करोगाने निधन झाले होते, तर हिरालालही कर्करोगाने त्रस्त होते. दुर्दैवी बाब म्हणजे त्यांच्या चारही मुली अपंग होत्या, त्यांना चालता येत नव्हती.

कर्करोग आणि मुलींच्या संगोपनाच्या काळजीने त्रस्त असलेल्या हिरालाल यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हिरालाल यांनी चार मुलींसह विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपवले. हिरालाल यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना आधी वाटले हे लोक गावी गेले आहेत, पण घरातून दुर्गंधी आल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी 10:18 वाजता शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल यांत्या चारही मुली अपंग होत्या. यातील एक मुलगी अंध होती. एकाला चालायला त्रास होत होता. मुलींच्या उपचाराच्या खर्चाने ते त्रस्त होते. दिल्ली पोलिसांसह घटनास्थळाचा तपास दिल्ली एफएसएल, सीबीआय एफएसएल आणि सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या आहे असे दिसते, पण या पाच जणांनी एकत्र असे पाऊल कसे उचलले? वडिलांनी मुलींना विष पाजून आत्महत्या केली का? असे सवाल उपस्थित होत असून या प्रकरणामागील खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT