Disgusting act of youth outside girls PG saam tv
देश विदेश

Delhi Crime News: दिल्लीत मुलींच्या PG हॉस्टेलबाहेर तरुणाचं किळसवाणं कृत्य, Video इंटरनेटवर व्हायरल

Delhi Latest News Updates: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Chandrakant Jagtap

Man Spotted Doing Indecent Act Outside Girls PG In Delhi: दिल्लीतील एका मुलीच्या पीजी हॉस्टेलबाहेर एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या या किळसवाण्या कृत्या व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वाती मालीवाल यांनी सोमवारी ट्विटरवर दोन व्हिडिओ शेअर केले. यात एक तरुण रात्रीच्या वेळी मुलीच्या पीजी हॉस्टेलबाहेर उभा राहूण अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

स्वाती मालीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “आम्हाला दोन तक्रारी मिळाल्या की एक मुलगा रात्री मुलींच्या पीजी हॉस्टेलच्या बाहेर उभा राहून अश्लील कृत्य करतो. दोन्ही व्हिडिओ एकाच व्यक्तीचे असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांना हजेरीचे समन्स बजावले असून कारवाईचा अहवाल मागवला. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय. (Marathi Tajya Batmya)

आउटलुकमधील एका रिपोर्टनुसार, दिल्ली महिला आयोकडे एक तक्रार करण्यात आली होती. त्यात 12 जूनच्या मध्यरात्री एक पुरुष पीजी निवासस्थानाबाहेर उभा राहिला आणि बाल्कनीत उभ्या असलेल्या काही महिलांकडे एकटक पाहत असताना त्याने अश्लील कृत्य केले. (Latest Political News)

दिल्ली पोलिसांना 19 जून रोजी या घटनेबाबत कृती अहवाल (एटीआर) मागणारी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र दिल्ली पोलिसांना उत्तर देण्यात अपयश आले. मॉरिस नगरच्या एसएचओला 28 जून रोजी दिल्ली महिला आयोगासमोर एटीआर रिपोर्टसह हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील ६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी; तुकाराम मुंढेंची परभणीच्या पालक सचिव म्हणून नियुक्ती

Chanakya On Women Qualities: महिलांच्या सौंदर्यांवर नाही तर या सवयी पाहून पुरुष पडतात प्रेमात

Gold-Silver Price: एका झटक्यात चांदी ₹ १५२०० वाढली, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; नेमकं कारण काय?

Tv Screen Colour Meaning: टीव्हीची स्क्रिन काळ्या रंगाचीच का असते?

Maharashtra Live News Update: 'हात मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर किरीट सोमय्यांचा विरोध करणार' मालेगाव महापौरांचा किरीट सोमय्या यांना इशारा

SCROLL FOR NEXT