दिल्लीत कोरोनाचा कहर! 24 तासांत 100 हून अधिक कंटेनमेंट झोन, हजारच्या आसपास रुग्ण
दिल्लीत कोरोनाचा कहर! 24 तासांत 100 हून अधिक कंटेनमेंट झोन, हजारच्या आसपास रुग्ण Saam Tv
देश विदेश

दिल्लीत कोरोनाचा कहर! 24 तासांत 100 हून अधिक कंटेनमेंट झोन, हजारच्या आसपास रुग्ण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, कंटेनमेंट झोनच्या संख्येत देखील कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत (New Delhi) पुन्हा एकदा कोरोना (Corona) कहर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. (New Delhi Corona Update Latest News)

हे देखील पाहा :

दिल्ली आरोग्य विभागाच्या (Health Department) आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 100 हून अधिक कंटेन्मेंट झोन निदर्शनास आले असून, एकूण कोरोना रुग्णसंख्या 919 वर पोहोचली आहे. 26 एप्रिलपर्यंत शहरात 796 कंटेन्मेंट झोन (Containment Zone) होते. फक्त आठवड्याभराच्या काळात त्यात 30 टक्क्यांनी अधिकची वाढ झाली आहे. कंटेनमेंट झोनच्या संख्येत वाढ होण्याचे कारण म्हणजे दिल्ली शहरासह शेजारील जिल्ह्यांनी सक्रिय रुग्णसंख्येची (Patients) ठिकाणे शोधण्याची मोहीम राबवली आहे.

दिल्लीतील कंटेनमेंट झोनची संपूर्ण यादी वाचा

माध्यमांशी बोलताना दक्षिण दिल्लीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही मंगळवारपर्यंत ३०% सक्रिय रुग्ण कंटेनमेंट झोनमध्येच ठेवले आहेत. जिथे वेगाने संसर्ग फैलावण्याची शक्यता आहे अश्या कंटेनमेंट झोन्समधील नागरिकांना कोरोना बाधित रुग्णांबद्दल सूचित केले जात आहे. जेणेकरून बाधित रुग्णाच्या शेजाऱ्यांना त्या घरांची माहिती मिळेल आणि ते याबाबत काळजी घेऊ शकतील. नवीन रुग्णसंख्येनुसार आम्ही हळूहळू मनुष्यबळ आणि कोविड संबंधित कर्तव्ये व्यवस्थापित करण्यासाठी निधीची मागणी करत आहोत. मात्र, अद्याप कोणतेही क्षेत्र सील करण्याचा आमचा विचार नाही."


दुसऱ्या एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आम्ही पुन्हा नियंत्रणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. क्लस्टर प्रकरणांचा कोणताही अहवाल नसल्यास, कोणतेही नवीन कंटेनमेंट झोन असणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण दिल्ली सर्वात जास्त प्रभावित

कोरोना रुग्णसंख्येच्या जिल्हावार विभाजनाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की दक्षिण दिल्ली, शहराच्या रुग्णसंख्येत प्रत्येक दुसऱ्या रुग्णाची भर घालत आहे. दक्षिण दिल्ली ज्यामध्ये दक्षिण आणि दक्षिण पूर्व जिल्ह्यांचा समावेश आहे, येथेच कोरोना व्हायरसच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दक्षिण-पश्चिम आणि नवी दिल्ली यांसारखे जिल्हे जे दक्षिण दिल्लीच्या अंतर्गत येतात ते कमी किंवा कमी होत असलेल्या प्रकरणांची नोंद करत आहेत.

कोरोना बाधितांच्या जिल्हावार वितरणाच्या दिल्ली सरकारच्या विश्लेषणानुसार, 23 एप्रिलपर्यंत दक्षिण जिल्ह्यात 888 सक्रिय रुग्ण सापडले आहेत. तर, दक्षिण पूर्वमध्ये 630 सक्रिय रुग्ण आहेत. दक्षिण-पश्चिम आणि नवी दिल्ली जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 482 आणि 337 कोरोना रुग्ण आहेत.

दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या

दिल्लीत बुधवारी 1,367 नवीन कोविड रुग्नांची नोंद झाली आहे. जी बुधवारच्या संख्येपेक्षा (1,204) 13 टक्क्यांनी वाढली आणि एक मृत्यू झाला तर पॉझिटिव्हिटी रेट 4.50 टक्के होता. सलग सहाव्या दिवशी राष्ट्रीय राजधानीत एका दिवसात 1,000 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडली. राष्ट्रीय राजधानीत संसर्गाची संख्या 18,78,458 आहे आणि मृत्यूची संख्या 26,170 वर पोहोचली आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत प्रतिक्रिया देताना, दिल्लीचे आरोग्य मंत्री डॉ. सत्येंद्र जैन म्हणाले, "दिल्लीमध्ये सुमारे 5,000 सक्रिय कोविड रुग्ण आहेत, परंतु हॉस्पिटलमध्ये प्रवेश फारच कमी आहेत. आमच्याकडे दिल्लीत 10,000 बेड आहेत त्यापैकी फक्त 100 जागा व्यापल्या आहेत. प्रत्येकाला बूस्टर डोस देण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत."

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

Morning Tips : सकाळच्या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर; आज अवलंबा...

Cricket Records: वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Today's Marathi News Live: पुण्यातील रेस कोर्स मैदानावर उद्या नरेंद्र मोदींची सभा

Gujarat News: 600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT