DELHI CJP PROTEST: KEJRIWAL, MAMATA BANERJEE DETAINED saam tv
देश विदेश

दिल्लीच्या CJP आंदोलनात 3 बड्या नेत्यांसह कोणाकोणाला घेतले ताब्यात? यादी आली समोर

Gyanesh Kumar Resignation Row: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत CJP आणि विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू आहे. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, पिनराई विजयन यांच्यासह कोणाकोणाला पोलिसांनी ताब्यात घेतले? वाचा संपूर्ण यादी

Omkar Sonawane

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीने एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले असून दिल्लीमध्ये आंदोलकांची मोठी गर्दी उसळली आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्यामुळे सगळ्यांचीच धरपकड सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, संजय सिंह, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक यांनाही ताब्यात घेतले. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह मी जंतर-मंतरवर पोहोचेल, असे केजरीवाल म्हणाले होते. संपूर्ण देश ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

ममता बॅनर्जी यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार डेरेक ओ ब्रायन, खासदार प्रतिमा मंडल आणि खासदार डोला सेन यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. ममता बॅनर्जी या बसथांब्यावर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासह सहकाऱ्यांना पोलिसांनी साऊथ एव्हेन्यू या ठिकाणाहून ताब्यात घेतले. दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी नेहा बोरा हिच्यासह AISA च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नेहा बोराला ज्या बसमधून ताब्यात घेतले जात होते, त्या बसला कार्यकर्त्यांनी अडवले होते.

तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निदर्शने करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर पंजाबच्या चंदीगढमध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला आजही ती खंत! केबीसीच्या मंचावर सोनाली बेंद्रेसमोर केला खुलासा

कौशल्यविकास विभाग विश्वविक्रमासाठी सज्ज! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra News Live Update: मुंबईत आंदोलकांची धरपकड

Orange Benefits: आंबट- गोड संत्रा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

Eye Twitching : एका डोळ्याचे फडफडणे काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ, वेळीच ओळखा 'हे' संकेत

SCROLL FOR NEXT