Chandni Chowk Fire Twitter/@ANI
देश विदेश

दिल्ली: चांदनी चौकातील मार्केटला भीषण आग; 105 दुकाने जळून खाक

देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) चांदणी चौकात लजपत राय या मार्केटमध्ये आज भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) चांदणी चौकात लजपत राय या मार्केटमध्ये आज भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण काय आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एकूण 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तसेच आग विझवण्याचे शर्तीचे पर्यंत सुरु आहेत. (lajpat nagar market latest news)

दिल्ली अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी राजेश शुक्ला यांनी या आगीबाबत माहिती दिली आणि सांगितलं की, “ आगीमुळे एकूण 105 दुकाने पेटले आहेत, या भागाला तेह बाजारी असे म्हणतात. नागरिकांचे म्हणणे आहे कि, शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. तर, आग विझवण्यात आली असून सध्या कूलिंगचे काम सुरु आहे.

घटनासथळी मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलासह स्थानिक लोकही मोठ्या संख्येने उपस्थित असून त्यांनीही मदतकार्यात हातभार लावला. अग्निशमन विभागाने सांगितले की, आम्हाला आगीची माहिती सकाळी पहाटे 5.45च्या सुमारास मिळाली होती. या अपघातामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

दिल्लीतील चांदणी चौक ही बाजारपेठ देशभर प्रसिद्ध आहे. कपड्यांची दुकाने तसेच इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारात दररोज लाखो लोक खरेदीसाठी येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT