Delhi Building Collapse Saam Tv
देश विदेश

Building Collapse: इमारत दुर्घटनेप्रकरणी मालकाला अटक, उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Delhi Building Collapse Update: दिल्ली इमारत दुर्घटने प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. इमारतीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

Priya More
  • सत्य निकेतन इमारत दुर्घटनेप्रकरणात मोठी अपडेट

  • इमारत मालकाला पोलिसांकडून अटक

  • या प्रकरणी ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले

  • सत्य निकेतन इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू

  • दिल्ली इमारत दुर्घटना प्रकरणात एमसीडीची मोठी कारवाई

दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील ५० वर्षे जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली महानगर पालिकेने मोठी कारवाई करत दक्षिण विभागाच्या उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. या प्रकरणी इमारतीचा मालक हरिरामला दिल्ली पोलिसांनी अटक केली. इमारत कोसळल्यानंतर तो गायब झाला होता. पोलिसांनी राजस्थानच्या भिवाडी येथून त्याला अटक केली. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

रविवारी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात अचानक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेनंतर सोमवारी एमसीडीने जारी केलेल्या आदेशानुसार, उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. उपायुक्त राकेश कुमार, अधीक्षक अभियंता रणवीर सिंग, कार्यकारी अभियंता ललित कुमार गोयल, सहायक अभियंता सुनील चौहान, कनिष्ठ अभियंता आशिष कुमार या ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोध आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सत्य निकेतन याठिकाणी इमारत दुर्घटनेच्या ठिकाणी भेट दिली. त्यांच्यासोबत दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी आले होते. दिल्ली सरकारने रविवारी इमारत कोसळण्याच्या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आणि या घटनेची जबाबदार आढळलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रेखा गुप्ता यांनी जवळपासच्या पेइंग गेस्ट निवासस्थानांची आणि इमारतींची सखोल तपासणी करण्याचे देखील आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर कोणत्याही इमारती सील केल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT