Delhi: भाजप खासदार मनोज तिवारी निदर्शना दरम्यान जखमी; रुग्णालयात दाखल Saam Tv
देश विदेश

Delhi: भाजप खासदार मनोज तिवारी निदर्शना दरम्यान जखमी; रुग्णालयात दाखल

भोजपुरी गायक मनोज तिवारी जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दिल्लीतुन Delhi एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप खासदार आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी Manoj Tiwari हे निदर्शनादरम्यान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेच्या उत्सवांवर बंदी घालण्याच्या आप सरकारच्या AAP Government निर्णयाविरोधात भाजप रस्त्यावर उतरला होता. भाजपचे खासदार मनोज तिवारीही कामगारांसह रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या घराबाहेर छठ पूजेवरील बंदीच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी गेले. या दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी वॉटर तोफांचा वापर केला. त्यामुळे मनोज तिवारी जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने सफदरजंग हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे खासदार मनोज तिवारी दिल्लीतील छठ पूजेवरील बंदी हटवण्याच्या मागणीसाठी कामगारांसह सीएम हाऊसजवळ निदर्शने करत होते. या दरम्यान दिल्ली पोलिसांनी सीएम हाऊसच्या आसपास बॅरिकेड केले होते. त्याठिकाणी मनोज तिवारी बॅरिकेड वर चढले आणि ते ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर तोफांचा वापर केला. त्यामुळं बॅरिकेडवरून पडून ते बेशुद्ध पडले. यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) गेल्या आठवड्यात एका आदेशात, कोविड -19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठ, जलाशय आणि मंदिरांसह सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा साजरी करण्यास बंदी घातली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

SCROLL FOR NEXT