Delhi Baby Care Hospital Fire 
देश विदेश

Delhi Hospital Fire: बेबी केअर सेंटरचा मालक नवीनला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव

Delhi Baby Care Hospital Fire :बेबी केअर सेंटरचे मालक डॉ. नवीन खिची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. डॉ.खिची यांना दिल्लीतून अटक करण्यात आलीय. नवीन खिची हे दिल्लीत अनेक बेबी सेंटर चालवतात.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: दिल्लीतील पूर्वी भागातील विवेक विहारामधील बेबी केअर सेंटरमध्ये लागेल्या आगीत ७ बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आग जेव्हा आग लागली तेव्हा रुग्णालयात १२ नवजात बालकं होती. दरम्यान आगीत होरपळून जखमी झालेल्या ५ बालकांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटने प्रकरणी बेबी केअर सेंटरचे मालक डॉ.नवीन खिची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. दुर्घटनेनंतर ते फरार झाले होते.

निष्काळजीपणामुळे बेबी केअर सेंटरमध्ये आधीही घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये नवीन खिची आणि केअर- नवजात आणि बाल रुग्णालय, विवेक विहार फेज वन विरुद्ध आयपीसीच्या कलम ३२५, ५०६, ३४ आणि बाल न्याय कायदा (मुलांचे संरक्षण आणि काळजी) कलम ७५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आलाय. या एफआयआरमध्ये नवीन खिची यांच्यावर नर्सिंग होमची नोंदणी न केल्याचा आणि केस हिस्ट्री खोटी केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा एफआयआर हातरस येथील एका जोडप्याने दाखल केलाय.

रुग्णालयात दाम्पत्याच्या मुलाचा डावा हात मोडला होता. जेव्हा या जोडप्याने हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा त्यांना कळले की एक नर्स त्यांच्या मुलाला मारहाण करताना दिसली होती. याबाबत दाम्पत्याने नवीन खिची यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दाम्पत्याला धमकावल्याचा आरोप आहे. तसेच २०२१ मध्ये तपासादरम्यान असेही आढळून आलं की, नर्सिंग होमची दिल्ली नर्सिंग होम कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली नव्हती. परंतु दंड भरल्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात आले होते.

दरम्यान आजच्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ७ निष्पाप बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेबी केअर सेंटरची पाहणी केली का? सर्व निकषांची पूर्तता करूनच केंद्र चालवण्याची परवानगी होती का? बेबी केअर सेंटरला फायर एनओसी मिळाली होती का? स्थानिक पोलिसांच्या संगनमताने ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचे काम बेकायदेशीरपणे सुरू होते का? स्थानिक पोलिसांचं कमिशन चालू होत होतं का? परिसरातील प्रत्येकाला, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, बेबी केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचे बेकायदेशीर रिफिलिंग असल्याची माहिती होती, परंतु स्थानिक पोलिसांनी याकडे डोळेझाक केल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT