Kejriwal and Sisodia Trail as BJP Surges in Delhi Assembly Elections  
देश विदेश

Delhi Election Results : केजरीवाल, आतिशी, सिसोदिया पिछाडीवर; दिल्लीत आपला जोरदार धक्का

Delhi Election Results 2025 : राजधानी दिल्लीमध्ये सत्तांतर होत असल्याचे सुरूवातीच्या आकड्यावरून दिसत आहे. आपला जोरदार धक्का बसलाय. आपचे दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे सुरूवातीच्या कलामध्ये दिसत आहे.

Namdeo Kumbhar

Delhi assembly election 2025 result live updates vote counting : राजधानी दिल्लीमध्ये सत्तांतर होत असल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचे सुरूवातीचे कल हातात आले आहेत, त्यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ४५ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठलाय, तर अरविंद केजरीवाल यांचा आप २5 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकाही जागेवप आघाडी मिळालेली नाही. सुरूवातीच्या कलांमध्ये आपला जोरदार धक्का बसलाय, दिग्गज पिछाडीवर आहेत.

सुरूवातीच्य कलांमध्ये आम आदमी पक्षाला जोरदार धक्का बसलाय. आप फक्त २७ जागांवर आघाडीवर आहे. इतकेच नाही तर स्टार नेते पिछाडीवर आहेत. आजी-माजी मुख्यमंत्री सुरूवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल, आतिशी आणि मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत. त्याशिवाय पटपडगंज मतदारसंघातून अवध ओझा यांनाही आघाडी मिळालेली नाही.

सुरूवातीच्या कलांमध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत, तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. कालकाजीमधून मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत, या मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधूडी आघाडीवर आहेत. त्याशिवाय जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत. शकूर बस्ती मतदारसंघात सतेंद्र जैन आघाडीवर आहेत. शाहदरा मतदारसंघात AAP उमेदवार जितेंदर सिंह शंटी आघाडीवर आहेत. ग्रेटर कैलाश मतदारसंघात आपचे सौरभ भारद्वाज आघाडीवर आहेत. विश्वासनगर मतदारसंघात भाजपचे ओपी शर्मा आणि शाहदरामधून भाजपचे संजय गोयल आघाडीवर आहेत. राखी बिडलान मादीपूरमधून आघाडीवर आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी आपमधून भाजपात गेले कैलास गहलोत बिजवासनमधून आघाडीवर आहेत. करावल नगर मतदारसंघातून कपिल मिश्रा आणि चांदनी चौक मतदारसंघातून सतीश जैन आघाडीवर आहेत. त्याशिवाय मालवीय नगरमधून सोमनाथ भारती पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे सतीश उपाध्याय आघाडीवर आहेत. त्याशिवाय राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंह सिरसा आघाडीवर आहेत.

ओखला, मुस्तफाबाद आणि बल्लीमारान मुस्लिम बहुल मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळलाय. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. अवध ओझा आपल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. त्याशिवाय सौरभ भारद्वाज यांनाही सुरूवातीच्या कलामध्ये जोरदार धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT