Indian Navy Saam Tv
देश विदेश

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; समुद्रात गस्तीसाठी कोस्टल गार्डला १५ विमाने मिळणार, 29000 कोटींचा करार

Defence Ministry News : मेड इन इंडिया प्रकल्पांतर्गत देशात १५ सागरी गस्ती विमानांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय सी-२९५ वाहतूक विमानही बनवण्यात येणार आहे.

प्रविण वाकचौरे

Mumabi News :

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी तब्बल २९ हजार कोटींचा करार केला आहे. या करारामुळे नौदलात एकूण १५ विमाने सामील होणार आहेत. सागरी पाळत ठेवणारी ९ विमाने आणि भारतीय तटरक्षक दलाला गस्त घालण्यासाठी ६ विमाने खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी मिळाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या करारानुसार, मेड इन इंडिया प्रकल्पांतर्गत देशात १५ सागरी गस्ती विमानांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय सी-२९५ वाहतूक विमानही बनवण्यात येणार आहे. हा करार एकूण २९ हजार कोटी रुपयांचा असेल. (Latest Marathi News)

संरक्षण मंत्रालयाने कानपूरस्थित कंपनीसोबत १७५२.१३ कोटी रुपयांचा करारही केला आहे. या कराराअंतर्गत १२.७ मिमीच्या ४६३ रिमोट कंट्रोल गन तयार करण्यात येणार आहेत. नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनाही या गन देण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या या करारांमुळे भारताची सागरी शक्ती तर वाढेलच शिवाय आत्मनिर्भर भारताला चालना मिळेल.

या करारांतर्गत टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम आणि एअरबस संयुक्तपणे विमानाची निर्मिती करतील. ही विमाने आधुनिक रडार आणि सेन्सर्सने सुसज्ज असतील. हा करार पूर्ण झाल्यानंतर नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पेट्रोलिंगच्या क्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.

हिंद महासागरात चीन ज्या प्रकारे आपली ताकद वाढवत आहे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवरही हल्ले वाढत आहेत. महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर होणारे वाढते हल्ले या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय नौदल सातत्याने आपली क्षमता वाढवत आहे. या करारामुळे नौदलाच्या तयारीला वेग येईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT