Rahul Gandhi  SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News: मोठी बातमी! मानहानी प्रकरणात राहुल गांधींची गुजरात उच्च न्यायालयात धाव; सुरत कोर्टाच्या निर्णयाला दिले आव्हान

Rahul Gandhi Defamation Case Update: राहुल गांधींच्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

Rahul Gandhi Defemation Case News: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्याबद्दलची एक महत्वाची माहिती समोर येत असून राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 'मोदी आडनावा संदर्भात मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. खासदारी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. परंतु, सुरत (Surat) कोर्टाने त्यांची याचिकाच फेटाळून लावली होती. त्यानंतर आता या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काय आहे हे प्रकरण...

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं.

त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

SCROLL FOR NEXT