DA HIKE
DA HIKE Saam Tv
देश विदेश

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार! महगाई भत्यात 4 टक्के वाढीची शक्यता; पगार किती वाढेल?

साम टिव्ही ब्युरो

DA Hike: केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते. सरकारकडून सध्याच्या ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्यात येतो. सरकार सध्याच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते आणि असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट ४ टक्क्यांनी वाढेल.

केंद्र सरकार आपल्या एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) सध्याच्या ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. कामगार आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो.

पगार किती वाढणार?

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन असेल तर १८००० असेल तर त्याला सध्याच्या ३८ टक्के महागाई भत्त्यानुसार ६८४० प्रति महिना मिळत असेल. मात्र नवीन महागाई भत्ता ४२ टक्के लागू झाल्यानंतर ही रक्कम ७५६० प्रति महिना होईल. याचा अर्थ दरमहिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपये वाढतील. यानुसार वार्षिक पगारातील वाढ ८६४० रुपये असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT