Deadliest Cyclone of history Great Bhola Saam TV
देश विदेश

History : अखेरची काळरात्र! विनाशकारी भोला चक्रीवादळ, ज्यात गेला होता ५ लाख लोकांचा जीव

13 November 1970 Day in History : 13 नोव्हेंबर 1970 मध्ये आलेले विनाशकारी वादळामुळे ५ लाख लोकांच जीव गेला होता.

Namdeo Kumbhar

मुंबई : (13 November 1970 Day in History) आज 13 नोव्हेंबर आहे. आजचा दिवस हा इतिहासात अत्यंत दु:खदायक दिवस म्हणून ओळखला जातो 1970 मध्ये आजच्याच दिवशी बांगलादेशात एक विनाशकारी वादळ आले होते. त्यात लाखो लोकांचा बळी गेला होता. या वादळाला भोला नाव दिले असले तरी त्याचे स्वरूप इतके भयंकर होते की त्याला द ग्रेट भोला म्हटले (Deadliest Cyclone of history 'Great Bhola') जाऊ लागले. बांगलादेशच्या निर्मितीच्या सुमारे एक वर्ष आधीच ही गोष्ट आहे. आजचा बांगलादेश तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता आणि तो पाकिस्तानचा भाग होता.

8 नोव्हेंबर 1970 रोजी या पूर्व पाकिस्तानात विनाशाला सुरुवात झाली. बंगालच्या उपसागरात भोला नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले. 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान ते तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. हे चक्रीवादळ इतके तीव्र होते की किनारपट्टीवर आदळताच समुद्रात 33 फूट उंचीच्या लाटा उसळू लागल्या.

वेग 144 वरून 222 किमी प्रति तास वाढला

त्यावेळी पूर्व पाकिस्तानातील चितगाव येथील हवामान खात्याने या वादळाचा वेग ताशी 144 किमी असल्याचे सांगितले होते, मात्र पुढील 45 मिनिटांत त्याचा वेग ताशी 222 किमीपर्यंत पोहोचला. अशा परिस्थितीत कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही आणि विध्वंसाचा नवा इतिहास रचला गेला.

भोला वादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा नेमका आकडा उपलब्ध नसला तरी या भीषण वादळात तीन ते पाच लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व पाकिस्तानमधील सुमारे 85 टक्के घरांना या वादळाचा तडाखा बसला होता.

36 लाख लोकांना बसला याचा थेट फटका 

बांगलादेश त्याच्या भौगोलिक स्थितीमुळे चक्रीवादळांसाठी अत्यंत संवेदनशील आहे. त्यातील 35 टक्के समुद्रसपाटीपासूनचा भाग 20 फुटांपेक्षा कमी आहे. जेव्हा भोलाने कहर केला तेव्हा रेडिओ पाकिस्तानने सांगितले की पूर्व पाकिस्तानातील चितगावजवळील 13 बेटांवर एकही माणूस जिवंत राहिला नाही. 36 लाख लोकांना याचा थेट फटका बसला.

भारतावरही झाला होता परिणाम

या वादळामुळे संपूर्ण बांगलादेशातील मासेमारी उद्योग उद्ध्वस्त झाला. किनारी भागात राहणाऱ्या 77 हजार मच्छिमारांपैकी सुमारे 46 हजार मच्छिमारांना आपला जीव गमवावा लागला. वादळाचा तडाखा बसल्याने जे वाचले तेही गंभीर जखमी झाले. यातून सावरण्यासाठी बांगलादेशला अनेक वर्षे लागली.  भोला चक्रीवादळाचा बांगलादेशसह भारतावरही परिणाम झाला. त्यामुळे भारताच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला. कोलकाताहून कुवेतला जाणारे सुमारे 5500 टन वजनाचे जहाज भोलाच्या धडकेने समुद्रात बुडाले. त्यामुळे जहाजावरील एकूण 50 जणांचा मृत्यू झाला होता.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT