Sputnik Lite Saam Tv
देश विदेश

DCGI कडून भारतात सिंगल-डोस स्पुतनिक लाइटच्या आपत्कालीन वापरास मान्यता!

देशात आपत्कालीन वापरासाठी सिंगल डोस स्पुतनिक लाइट वापरता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी दिली. DCGI च्या या मंजुरीनंतर ही देशातील 9वी लस ठरली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग पाहता लसीकरण (Vaccination) हेच सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. यामुळेच केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळवून देण्यासाठी भर देत आहे. कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या या युद्धात आता भारताला आणखी एका लसीची ताकद मिळाली आहे. DCGI ने भारतात सिंगल-डोस स्पुतनिक लाइटच्या (Single-dose Sputnik light) आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. आता देशातील आणीबाणीसाठी सिंगल डोस स्पुतनिक लाइट वापरता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी दिली. DCGI च्या या मंजुरीनंतर ही देशातील 9वी लस ठरली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताच्या औषध नियंत्रकाने रशियाच्या (Russia) स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली होती. स्पुतनिक लाइटच्या चाचणीला मंजुरी देण्यासाठी, कोरोना विषयावरील तज्ञ समितीने शिफारस केली होती. तर, Sputnik Lite लस दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतेही धोकादायक दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.

Sputnik-V आणि Sputnik Light मधील सर्वात मोठा फरक म्हणजे डोस. Sputnik-V ही लस दोनदा घ्यावी लागते, तर Sputnik Lite चा एक डोस पुरेसा असतो. तथापि, या दोन्हीच्या परिणामाबद्दल, लॅन्सेटच्या अभ्यासानुसार, स्पुतनिक-व्ही लस कोविड-19 विषाणूविरूद्ध स्पुतनिक लाइटपेक्षा अधिक प्रभावी आहे.

हे देखील पहा-

या दोन्हीपैकी कोणती लस अधिक प्रभावी?

कोरोना विरुद्ध स्पुतनिक-V चा प्रभाव सुमारे 91.6 टक्के आहे, तर या विषाणूवर स्पुतनिक लाइटचा प्रभाव 78.6 ते 83.7 टक्के आहे. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की स्पुतनिक लाइट रुग्णाच्या रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 87.6 टक्क्यांनी कमी करतो. तर, Omicron विरुद्ध Sputnik-V ही 75 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Rice Recipe: रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला आहे? 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्राई़ड राईस

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT