Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

खरात, अयाननंतर आणखी एक व्हिडिओकांड! ५०० महिला, प्रायव्हेट व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग, तरुणाच्या कृत्यानं सगळेच हादरले

Delhi Crime News: दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका तरुणाला अटक केली. या तरुणाने तब्बल ५०० महिलांची फसवणूक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. या महिलांकडून प्रायव्हेट व्हिडीओ मागवून त्याने त्यांना ब्लॅकमेल केले.

Priya More

Summary -

  • डेटिंग अ‍ॅपद्वारे ५०० महिलांना फसवणाऱ्या आरोपीला अटक

  • खासगी फोटो-व्हिडिओच्या माध्यमातून करायचा ब्लॅकमेल

  • २ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघड झाला

  • दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला केली अटक

सोशल मीडिया, डेटिंग आणि मेट्रिमोनियल वेबसाइट्सच्या माध्यमातून देशभरातील महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दक्षिण- पश्चिम दिल्ली जिल्हा पोलिसांनी जवळपास ५०० पेक्षा अधिक महिलांना हनीट्रॅप आणि रोमान्स स्कॅममध्ये अडकवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आनंद कुमार (३५ वर्षे) असे या आरोपीचे नाव असून त्याला पश्चिम बंगालच्या उत्तम २४ परगना येथून बेड्या ठोकण्यात आल्या.

तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, आनंद कुमारने डेटिंग अॅप्सवर डॉक्टर, वकील, व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता असल्याचे भासवून बनवाट प्रोफाइल तयार केली होती. तो मेट्रिमोनियल वेबसाइट्सवर जीवनसाथी शोधणाऱ्या महिलांना लक्ष्य करायचा. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांचे प्रायव्हेट फोटो आणि प्रायव्हेट व्हिडीओ मिळवायचा. यानंतर तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. हे प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची तो धमकी द्यायचा आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा.

या प्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आहे. पीडितेने तक्रारीत सांगितले की, आरोपीने तिच्याशी वैभव अरोरा नावाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून संपर्क साधला होता. आरोपीने तो व्यावसायिक असल्याचे सांगून तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आनंद नावाच्या एका खोट्या मित्राचीही ओळख करून दिली. त्यानंतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि व्यावसायातील नुकसानीचे निमित्त करून त्याने तिच्याकडून ७ लाख रुपयांची फसवणूक केली. जेव्हा महिलेने आपले पैसे परत मागितले तेव्हा त्याने मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवून संपर्क तोडला.

पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली. पोलिसांनी आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांची तपासणी केली. आरोपीचे ठिकाण पश्चिम बंगाल असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी ४ स्मार्टफोन, ८ सिम कार्ड, ३ डेबिट कार्ड आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपीच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी रुपये आढळून आले. आरोपीने अनेक महिलांना फसवले असल्याचे कबुल केले. महिलांची फसवणूक करून मिळवलेले पैसे त्याने ऑनलाइन गेमिंग आणि मौजमजा करण्यासाठी वापरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT