A still from the viral video showing the couple hugging while riding a bike on Yamuna Expressway, without helmets or safety precautions. Saam Tv News
देश विदेश

Viral: हायवेवर धावत्या बाईकवर रोमान्स; गर्लफ्रेंडला बाईकच्या टाकीवर बसवून मिठीत घेतलं अन्.. VIDEO

Romance on Bike: यमुना एक्सप्रेसवेवर धावत असलेल्या बाईकवर कपलचा रोमान्स व्हायरल झाला आहे. हेल्मेट न वापरता केलेल्या स्टंटमुळे पोलिसांनी त्यांच्यावर ५३,३०० रुपयांचा दंड ठोठावला.

Bhagyashree Kamble

कपल्सच्या रोमान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. काही जण खुल्लमखुल्ला रोमान्स करायला घाबरत नाही, पण त्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये तरूण बाईक चालवताना दिसत आहे. तर, मुलगी त्याला घट्ट मिठी मारून बसली आहे. बॉलिवूडमधील रोमॅण्टिक सीनप्रमाणे दोघांचा धावत्या बाईकवर रोमान्स सुरू आहे. एकाने हा व्हिडिओ शूट करून शेअर केला. हा व्हिडिओ पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी या कपलवर कारवाई केली आहे. तसेच दंडही वसूल केला आहे.

व्हायरल व्हिडिओ नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवरील आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तरूण विनाहेल्मेट बाईक चालवत आहे. तर, बाईकच्या टाकीवर बसून एक तरूणी त्याला मिठी मारत आहे. दरम्यान, कारमधून जाणाऱ्या एका व्यक्तीला कपलचं रोमान्स होत असल्याचं दिसलं. त्याने तातडीने व्हिडिओ शूट करून शेअर केला. काही क्षणात हा व्हिडिओ व्हायरल झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तपास केला.

तपासात दुचाकीस्वाराने नियमांचे उल्लघंन केले असल्याचं निष्पन्न झालं. हेल्मेटशिवाय बाईक, धोकादायक स्टंट, जाणूनबुजून वाहतूक सुरक्षेकडे दुर्लक्ष, या नियम मोडल्यामुळे पोलिसांनी दुचाकीस्वारावर ५३,३०० चे मोठे चलन आकारले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही अशी स्टंटबाजी फक्त प्राणघातकच नाही, तर रस्त्यावरून जात असलेल्या लोकांसाठीही घातक ठरू शकते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काही जण याला निष्काळजीपणा म्हणत आहे. तर, काही जण याला जाणूबुजून केलेले स्टंट म्हणत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT