Tragic Accident Saam tv
देश विदेश

Tragic Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

Tragic Accident in Madhya Pradesh : देवदर्शनावरून परतताना काळाने घाला घातला. मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. अपघाताची भीषण दुर्घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता नोहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिमरी गावात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. बांदकपूर येथून देवदर्शन करून जबलपूरला परतताना अपघाताची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील नोहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बनवार चौकी महादेव घाट पुलाजवळ एक कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळली. या कारमध्ये एक डझनहून अधिक प्रवासी होते. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जबलपूरच्या भीटा फुलर गावातील संपूर्ण कुटुंब होतं.

संपूर्ण कुटुंब बांदकपूरच्या जटाशंकर धाम येथून दर्शन करून जबलपूरला परतत होतं. पूल ओलांडताना ही दुर्घटना घडली. कारमध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यातील ६ लोकांनी जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांनी दमोह जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला. भीषण अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना दमोह जिल्ह्यातील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं.

अपघातात मृत पावलेल्यांचे नातेवाईक गोविंद सिंह यांनी सांगितलं की, अपघातात मृत पावलेले लोक एकाच कुटुंबातील होते. सर्व लोक बांदकपूर येथे देवदर्शनासाठी मंगळवारी सकाळी गेले होते. देवदर्शनावरून परतताना कारचा अपघात झाला. बनवारच्या महादेव घाट पुलावरून नदीत कार कोसळून भीषण अपघात झाला'.

मृतांची ओळख पटली

मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील सिमरी गावात झालेल्या अपघातातील जखमींची ओळख पटली आहे. रज्जो सिंह(५५), अंकीत, वैभव सिंह (१२), आयुष , रविंद्र (२२) असे अपघातात जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. तर लौग बाई, हल्की बाई, संपत बाई, गुड्डी बाई, बैजंती बाई, रचना, तमन्ना आणि शिब्बू हे अपघात मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, १३७ औषधांच्या किमती झाल्या कमी

SCROLL FOR NEXT