Cyclone Fengal News: केरळमध्ये २ डिसेंबर रोजी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. समुद्राच्या उंच लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तसेच हवामान विभागाने भूस्खलन होण्याचाही इशारा दिला आहे.
हवामान विभागाने केरळ राज्यातील ४ जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. येत्या ३ दिवसांत केरळमधील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी केरळच्या ४ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. हवामान विभागानुसार, सोमवारी २ डिसेंबर रोजी केरळमधील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात करण्यात आली आहे. केरळमधील मल्लपुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही भागात हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात करण्यात आली आहे.
हवामान विभागाने कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पथानामथिट्टा, अलाप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरकोडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या व्यतिरिक्त दक्षिण कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, चिक्कमगलूर, हसन,कोडागु, मैसूरू, चामराजनगरमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकातील काही भागातील पुढील ३ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात करण्यात आली आहे.
रेड अलर्टमध्ये पुढील २४ तासांत २० सेमीहून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑरेंज अलर्ट ११ सेमी ते २० सेमी पाऊस आणि यलो अलर्ट ६ सेमी ते ११ सेमीपर्यंत पावसाती शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात भुस्खलनाचाही इशारा देण्यात आला आहे. उतारावर असणाऱ्या भागांना हा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार, दिल्लीत २ ते ४ डिसेंबरपर्यंत कमाल तापमान २७ ते २८ डिग्री आणि किमान तापसान ११ ते १२ डिग्रीपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धुके देखील राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात २ आणि ३ डिसेंबरमध्ये अनेक जिल्ह्यात दाट धुके असण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही दाट धुके आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.