Biparjoy Cyclone Update Saam Tv
देश विदेश

Cyclone Biparjoy: 'बिपरजॉय' 15 जूनला गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता; सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी

Biparjoy Update News: बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकले आहे त्यामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे.

Shivani Tichkule

Cyclone Biparjoy Latest Update in Marathi: बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकले आहे त्यामुळे अरबी समुद्राला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही दिवसांत अधिक तीव्र चक्रीवादळात बदलू शकते असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातमधील (Gujarat) जखाऊ पोर्ट ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या संध्याकाळी बिपारजॉय चक्रीवादळ (Cyclone) ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह गुजरातमध्ये धडकणार असल्याची माहिती आहे. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी देखील वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

14 आणि 15 जून दरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे उभे पिकांचेही नुकसान होणार आहे.

वादळामुळे गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये तीव्र पाऊस आणि पुराची परिस्थिती उद्भवू शकते आणि कच्चा-पक्क्या घरांचे नुकसान होऊ शकते.याशिवाय गवताळ घरांची नासधूस, उभी पिके व रस्त्यांचे नुकसान, वृक्षारोपण व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वादळामुळे रेल्वे सेवा आणि वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणात जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीचा रस्ता बंद

Shoes And Socks Benefits: बुटांमध्ये सॉक्स का घालतात? कारण काय?

वरळीत ठाकरेसेना–भाजपमध्ये जोरदार राडा; शिवसैनिकांकडून फलकाची तोडफोड|VIDEO

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण

Woolen Cloth : हिवाळ्यात सतत लोकरीचे कपडे घालून मळले? स्वेटर धुवताना फॉलो करा 'ही' खास ट्रिक

SCROLL FOR NEXT