CYCLONE AKVAN ALERT saam tv
देश विदेश

चक्रीवादळाचा मार्ग बदलला; 14 राज्यांमध्ये कोसळणार धो-धो, 72 हजार नागरिकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी जाहीर

Cyclone Akvan Latest Update And Landfall Prediction: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अकवान चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे. 20 नोव्हेंबरला देशातील 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा IMD अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

देशभरातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अकवान' चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना पावसाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने IMD ने उद्या 20 नोव्हेंबर 2026 रोजी देशातील 14 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगडसह अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अकवान' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोलकाता आणि दक्षिण बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासूनच पाऊल सुरू झाला आहे.

ओडिशामध्ये चक्रीवादळाचा धोका

अकवान चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारनं विशेष खबरदारी घेतली आहे. जवळपास ८० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ७४ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. अकवान चक्रीवादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शुकवारी दुपारच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेशातील नरसापूर आंध्र प्रदेशातील नरसापूर आणि ओडिशातील पुरीदरम्यान चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने केंद्रापडा, कंधमाल, जगतसिंहपूर, गजपती, गंजाम आणि पुरी या सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच दक्षिण आणि किनारपट्टीवरील ओडिशातील अनेक जिल्ह्यांसह मयूरभंजमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'अकवान' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने शुक्रवारी राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

आणखी कुठे कुठे कोसळणार पाऊस?

मुसळधार पाऊस: ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल.

मध्यम स्वरूपाचा पाऊस: नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.

हलका पाऊस: आसाम आणि मेघालय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही; सुप्रीम कोर्टात खळबळजनक सुनावणी| VIDEO

DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

Panjab Election : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस धक्का, कंबोज यांचा भाजपात प्रवेश

Maharashtra News Live Update: आदानीच्या वीज प्रकल्पाचे काम चालूच

Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतरही सोने मिळाले नाही? बँकेने उशीर केल्यास द्यावे लागणार दररोज ५ हजार रुपये, वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT