Nephew Made Video of Aunti Saam TV
देश विदेश

धक्कादायक! काकू प्रियकरासोबत हॉटेलात; पुतण्यानं व्हिडिओ बनवला अन्...

सुरेश बाबू असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

बंगळुरू : लग्न झालेलं असताना प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध ठेवणं एका महिलेच्या चांगलचं अंगलट आलंय. पतीला धोका देत प्रियकरासोबत संबध ठेवणाऱ्याला महिलेला तिच्याच पुतण्यानं हॉटेलात नको त्या अवस्थेत पकडलं. इतकंच नाही तर, पुतण्यानं काकूचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 25 लाखांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (Bangalore Crime News Today)

कर्नाटकच्या बंगळूरू शहरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका सख्या पुतण्यानं आपल्या काकूला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडिओही बनवला. काकाला व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत त्याने काकूकडे 25 लाखांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या पुतण्यासह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे.

सुरेश बाबू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसह बंगळुरू शहरात राहते. गेल्या 10 वर्षांपासून या महिलेचे प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध होते. महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी हॉटेलात जात होती. दरम्यान, सुरेशची प्रेयसी आणि त्याच्या काकूची चांगली ओळख होती. (Bangalore News Today)

सुरेशच्या प्रेयसीला काकूच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय आला. एकेदिवशी तिने काकूला याविषयी विचारले असता कुणाला सांगू नको, असं म्हणत काकूने तिच्याजवळ आपल्या प्रेमाची कबूली दिली. दरम्यान, प्रेयसीने तातडीने ही गोष्ट आपला प्रियकर सुरेश म्हणजेच काकूच्या पुतण्याला सांगितली.

त्यानंतर दोघांनीही काकूला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला. एकेदिवशी काकू आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली. तेव्हा काकूने रुमही बुक केली. त्याचवेळी सुरेश आणि त्याच्या प्रेयसीने काकूच्या बाजूची रूम बुक करत काकूवर नजर ठेवली.

जेव्हा काकूचा प्रियकर भेटण्यासाठी हॉटेलात आला. तेव्हा बेल वाजवत दोघांनीही हॉटेलमधील काकूच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुरेश आणि त्याच्या प्रेयसीने काकूसह तिच्या प्रियकराचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ काकाला दाखवून तो व्हायरल करू अशी धमकी देत दोघांनीही काकूकडे 25 लाख रुपयांची मागणी केली.

आपले विवाहबाह्य संबंध पतीला कळू नये म्हणून सुरूवातीला काकूने काही पैसे पुतण्याला दिले. मात्र दिवसेंदिवस त्याची मागणी वाढतच असल्याने काकूने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी सुरेशसह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT