Uttar Pradesh 4 years Old girl Rape Case News Saam Tv
देश विदेश

Shocking : ४ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार; ६० वर्षांच्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर

Uttar Pradesh Rape News : उत्तर प्रदेशात ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या ६० वर्षीय आरोपीला अटक करण्याच्या कारवाईदरम्यान पोलिस चकमकीत गोळ्या लागल्या.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशात ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

  • याप्रकरणी ६० वर्षीय आरोपीला अटक

  • कारवाईदरम्यान पोलिस चकमकीत आरोपीला गोळ्या लागल्या

  • आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ६० वर्षाच्या नराधमाने ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करताना पोलिस चकमकीत आरोपी जखमी झाला आहे. रविवारी पहाटे आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर त्याने गोळीबार केला, याद्म्र्यान झालेल्या कारवाईत त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक अंकिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अबरार याला पकडण्यासाठी पोलिसांनी रविवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास सापळा रचला होता. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी जखमी झाला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने २५ जून रोजी ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला जबरदस्ती शेतात नेले. तिथेच तिच्यावर बलात्कार करून नराधम राक्षसाने तिचा आमनुष छळ केला. पीडित मुलगी वेदनेने विव्हळत राहिली. मात्र आरोपीला तिची जराही दया आली नाही. बलात्कारानंतर आरोपीने मुलीला घटनास्थळी सोडून पळ काढला. दुसरीकडे मुलीची अवस्था फार गंभीर होती. अतिरक्तस्रावाने तिची तब्बेत बिघडली आणि ती जागीच बेशुद्ध झाली. दरम्यान रात्र झाली तरी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मुलगी नजरेआड झाल्याने तिची आई आणि वडील दोघेही तणावात होते.

मुलीचा शोध न लागल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तातडीने तपासाला गती दिली. यादरम्यान गावातील स्थानिक नागरिकांना शेतात लहान मुलगी जखमी अवस्थेत आढळली आणि एकच खळबळ उडाली. नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासात तक्रार दाखल झालेली बेपत्ता असलेली मुलगी असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर मुलगी गंभीर जखमी असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार व तपासणी करण्यात आली.

तपासादरम्यान मुलीच्या जबाबावरून पोलिसांना आरोपीची ओळख पटली. आरोपी हा सुमारे ६० वर्षांचा असून तो पीडित मुलीच्या गावातच राहत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस अधीक्षक अंकिता शर्मा यांनी सांगितले की, मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना दिली रामाची उपमा

Actor Harassment: प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; मानधन मागितल्यावर केली मारहाण, दिली जीवे मारण्याची धमकी

Gold Price Today: सोनं 6,662 रुपयांनी आणि चांदी 22,314 रुपयांनी स्वस्त; ही घसरण किती दिवस राहणार?

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

SCROLL FOR NEXT