Kanpur Crime News Saam Tv
देश विदेश

Cricketer Fraud : क्रिकेटपटूकडून ३५ लोकांना कोट्यवधींचा गंडा; इंजिनीअर मित्रानेही दिली साथ, नेमकं प्रकरण काय?

Kanpur Crime News : कानपूरमध्ये क्रिकेटर, कुस्तीपटू आणि इंजिनियर यांनी बँक अधिकारी बनून तब्बल ३५ जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून लक्झरी कार, लॅपटॉप, क्रिकेट किट, आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

Alisha Khedekar

क्रिकेटर विवेक शर्मा आणि इंजिनियर अनुज तोमर यांनी ३५ जणांना लाखो रुपयांना लुटलं

“बँक अधिकारी” बनून क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याचं आश्वासन दिलं

पोलिसांनी दोघांना अटक करून लक्झरी वस्तू जप्त केल्या

कर्जाच्या बोजामुळे क्रिकेटर सायबर गुन्ह्यांकडे वळल्याचं पोलिस तपासात समोर आलं

कानपूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका क्रिकेटरने आणि इंजिनियरने मिळून ३५ जणांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. धक्कदायक म्हणजे यांच्यावर झालेल्या कर्जाच्या बोजातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांनी हडप केलेले पैसे ताब्यात घेतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचा क्रिकेटपटू विवेक शर्मा आणि पंजाबचा कुस्तीगीर अनुज तोमर या दोघांनी आपली ओळख बँक अधिकारी सांगत तब्बल ३५ जणांना लाखो रुपयांना लुटले. याप्रकरणी कानपुर येथील गुजैनी परिसरातून सुनील नावाच्या व्यक्तीला या दोघांनी बँकेचे अधिकरी असून आम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवू शकतो असा बनाव केला. त्यानंतर या दोघांनी मिळून सुनील यांच्या बँक खात्यातून पैसे उकळले. सुनील याला संशय आल्याने त्याने याची तक्रार पोलिसांत केली.

सुनील यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत याप्रकरणाचा छडा लावायला सुरुवात केली. बँक खाती, मोबाइल डेटा आणि ऑनलाइन व्यवहार तपासल्यानंतर पोलिसांना काही धागेदोरे हाती लागले. त्यानुसार तपास करत पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथून विवेक शर्मा आणि मोहाली येथून अनुज तोमर यांना अटक केली. त्यांच्याकडून एक महागडी थार कार, मोबाइल फोन, लॅपटॉप, क्रिकेट किट, महागडे बॅट आणि अनेक लक्झरी वस्तू जप्त करण्यात आल्या.

शिवाय या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, यातील विवेक शर्मा हा बी.टेक पदवीधर असून क्रिकेटर आहे आणि त्याचा दुसरा साथीदार अनुज तोमर हा एमबीए असून पंजाबचा कुस्तीगीर आहे. क्रिकेट खेळताना विवेकवर मोठे कर्ज झाले होते. त्याच्यासोबत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका तरुणाकडून त्याने फसवणूकीची कला शिकली . त्याच्या घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका तरुणाने त्याला फसवणूकीची कला शिकवली.

जलद पैसे कमवण्याच्या इच्छेने तो सायबर गुन्ह्यांकडे वळला. दरम्यान, बागपत येथील रहिवासी अनुजने अनेक राज्यस्तरीय कुस्ती पदके जिंकली आहेत. फसवणुकीद्वारे कमावलेल्या पैशाने ते दोघेही आरामाचे जीवन जगू लागले. तथापि, सायबर सेलच्या सखोल चौकशीमुळे दोघेही आता तुरुंगात आहेत. पोलिसांनी सांगितले की ते त्यांच्या तिसऱ्या जोडीदाराचा शोध घेत आहेत आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.हा तिसरा आरोपी इंजिनियर असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमधील प्रारूप मतदार यादीतून चक्क भाजप नेत्याचच नाव गायब

Face glow: चेहऱ्यावर ग्लो हवाय? थंडीच्या दिवसात हा ज्युस देईल तुम्हाला चमकदार त्वचा

Apple With Black Salt : सफरचंदावर काळे मीठ टाकून खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Tomato Chutney: टोमॅटो आवडत नाही? मग 'ही' गावरान स्टाईल चटणी बनवा

Green Peas Peeling : किचकट काम होईल सोपं, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर मटार

SCROLL FOR NEXT