covid news  saam tv
देश विदेश

COVID News: कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर,कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन,अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू

New COVID Variant NB.1.8.1: देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणार ठरलीय. कारण 5 वर्षांच्या मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना आता चिमुरड्यांच्या जीवावर उठलाय. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केलीय. कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांवर पोहचलीय. त्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलींचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचं टेन्शनही वाढलंयं. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट मुलांसाठी किती धोकादायक आहे. पाहूयात

कोरोना उठला मुलांच्या जीवावर

ओमायक्रॉनचे JN.1, LF.7 आणि NB.1.8.1 या सब व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला

WHO नुसार NB.1.8.1 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरिएंट

डेल्टा आणि ओमायक्रॉनसारख्या व्हेरिएंटनंतर मुलांनाही कोरोनाची लागण

लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार

देशाच्या रूग्णसंख्येत लहान मुलांचे प्रमाण 13 टक्के

मुलांमध्ये डायरिया, अति सुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक

अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू

दरम्यान SARS-CoV-2 आणि NB.1.8.1 या कोरोना व्हेरिएंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलयं. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी, ते पाहूयात...काय खबरदारी घ्यावी?

मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे

मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात

मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणे टाळावे

शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी

कोरोनाचा वाढ प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळची घेणं गरजेचं आहे. मुलाची रोग प्रतिकारशक्त कशी वाढता येईल, यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षण आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT