China Covid Cases Saam Tv
देश विदेश

कोरोनाचा उद्रेक! चीनच्या 'या' शहरात नवव्यांदा लॉकडाऊन; २ लाख लोकांनी सोडलं शहर

china corona 4th wave : मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत असल्याने चीनी प्रशासनाने २ कोटी लोकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

शांघाय: चीनची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या शांघाय शहरात (Lockdown in Shanghai) कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. वाढत्या कोरोना संकटामुळे इथे भीषण परिस्थिती निर्माण होत चालली आहे. बुधवारी चीनमध्ये तब्बल १,९०८ कोरोना रुग्ण (China Corona 4th Wave) आढळून आले, त्यापैकी १,६६१ रुग्ण हे एकट्या शांघाय शहरामधील आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या २४ तासांत शांघाय शहरात कोरोनामुळे ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या (China Covid Cases) आढळून येत असल्याने चीनी प्रशासनाने २ कोटी लोकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या घरात एखादा कोरोना रुग्ण आढळतो, त्या घराला शांघाय प्रशासन क्वारंटाइन करत आहे. घराचा दरवाजा सील केला जातो. घराबाहेर पडण्यालाच मनाई केली जात आहे. घराच्या दाराबाहेर एक यंत्र लावले जाते. यामुळे कोणी सील तोडून घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तर जवळच्या पोलीस ठाण्याला आणि कोरोना नियंत्रण कक्षाला माहिती मिळते. संबंधित विभागांचे पथक घटनास्थळी पोहोचते आणि घराबाहेर पडणाऱ्यास पकडून जबरदस्तीने क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले जात आहे.

2 लाख लोकांनी 'रुइली' शहर सोडलं

दुसरीकडे, चीनच्या दक्षिण-पश्चिमी भागात असणाऱ्या रुइली शहरात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रुईलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रुइलीमध्ये आतापर्यंत तब्बल ९ वेळा लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती आहे. रुइली हे शहर चीन आणि म्यानमारमधील व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. अनेक आठवड्यांपासून येथे लॉकडाऊन आहे. त्यामुळे येथून २ लाख लोकांना शहर सोडावे लागले आहे.

चीनची अर्थव्यवस्थाही संकटात

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. International Monetary Fund म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुद्धा चीनच्या शून्य कोविड धोरणाचा हवाला देत चीनचा विकास दर ४.८% वरून ४.४% पर्यंत कमी केला आहे. जो चीनच्या ५.५ % विकास दराच्या तुलनेत खूपच कमी आहे. चीनमध्ये एका वर्षाहून अधिक काळानंतर पहिल्याच व्यापारात घट झाली आहे. आतापर्यंत चीनच्या तब्बल ३१ शहरांमध्ये बेरोजगारी आहे. पुढील ३ महिने अशीच परिस्थिती राहिली तर, चीनमध्ये मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT