Covid 19 In India Saam Tv
देश विदेश

Covid 19 In India : सावधान ! मास्क आणि सोशल डिस्टसिंग आवश्यक, बूस्टर डोस घ्यावा लागेल? पुन्हा लॉकडाऊन लागेल का?

कोमल दामुद्रे

Covid 19 In India : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे, नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी इशारा दिला आहे की, कोरोना अजूनही आपल्यामध्ये आहे, त्यामुळे आपण सतर्क राहणे आवश्यक आहे.

पॉल म्हणाले की, कोविड-19 अजूनही आहे, गेल्या काही दिवसांत त्यात झपाट्याने वाढ झालेली दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या संक्रमणांनुसार पुन्हा खबरदारी घेणे आवश्यक आहे. मास्क व सोशल डिस्टसिंग सोबत आपल्याला कॉर्बेव्हॅक्स लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. सावधगिरीसाठी त्यांनी कॉर्बेवॅक्ससह हेटरोलॉगस किंवा मिक्स-मॅच या डोसला देखील मंजूरी केली आहे.

NITI आयोगाच्या सदस्याचा इशारा - कोरोना गेला नाही

NITI आयोग सदस्य (आरोग्य) यांनी इशारा दिला आहे की, सध्या कोरोना संसर्गाशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि त्याबद्दल अजूनही काही सांगता येणार नाही. हे टाळण्यासाठी, लसीच्या नियमानुसार डोस (Vaccine) घेणे आवश्यक आहे. कोवॅक्सिन आणि कोविडशील सोबत आता कॉर्बेवॅक्स लस देखील बूस्टर डोस म्हणून दिली जात आहे, त्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

१८ ऑगस्टनुसार १२,६०८ नवीन रुग्ण आढळले

कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोविडचे १२,६०८ नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत आज सुमारे साडेतीन हजार अधिक प्रकरणे समोर आली आहेत. बुधवारी भारतात कोविड-19 चे ९,०६२ नवीन रुग्ण आढळले. सक्रिय प्रकरणांची संख्या आता १,०१,३४३ वर पोहोचली आहे. दैनंदिन सकारात्मकता दर ३.४८% इतका आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले - कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत

केंद्रीय आरोग्य (Health) मंत्रालयाने सांगितले आहे की देशातील ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचे अर्ध्याहून अधिक रूग्ण सक्रिय झालेले पुन्हा आढळून आले आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण मिळाले आहेत. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि गुजरातमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १,०५,०५८ वर पोहोचली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर २.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT