Coldrif cough syrup banned after reports of 14 child deaths in multiple states. saam tv
देश विदेश

Cough Syrup: खोकल्याचं औषध ठरलं विष; 14 मुलांचा मृत्यू, कफ सिरपबाबत सरकारचा निर्णय काय?

Cough Syrup Turns Poison 14 Children Dead: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे १४ मुलांचा मृत्यू झालाय. राज्य सरकारने या सिरपवर बंदी घातली आहे, तर केंद्र सरकारने याबाबत मार्गदर्शक सचूना जारी केल्या आहेत.

Bharat Mohalkar

  • कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 14 मुलांचा मृत्यू झाला.

  • मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि तामिळनाडू सरकारने बंदी घातलीय.

  • किडनी निकामी होण्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं निदान समोर आलंय.

तुमच्या मुलांना देण्यात येत असलेलं कफ सिरप 12 चिमुकल्यांसाठी विष ठरलंय. त्यामुळं सरकारने कफ सिरपवर बंदीचा मोठा निर्णय घेतलाय. मात्र कोणत्या सरकारने कफ सिरप बंदीचा निर्णय घेतलाय? आणि त्यासंदर्भात नेमक्या काय मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

खोकल्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दिलेलं औषध चिमुकल्यांसाठी जीवघेणं ठरलंय. मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे किडनी निकामी झाल्यानं 9 तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला आणि सरकारी यंत्रणेचे डोळे खाडकन उघडले. मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ या कफ सिरपवर मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि राजस्थान सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. तर केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य सरकारांना पत्र लिहून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र या पत्रात नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.

2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना कफ सिरप देऊच नये

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांनाही कफ सिरप देणं टाळा

चिमुकल्यांना गरम पाण्याची वाफ द्यावी

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे 12 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं देशभरात भीतीचं वातावरण आहे.. त्यातच आता केंद्र सरकारने कोल्ड्रीफ या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. कोल्ड्रीफमध्ये डायइथिलिन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त आढळून आलंय.

याच डायइथिलिन ग्लायकॉलमुळे किडनी फेल होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे खोकल्यापासून संरक्षण देण्यासाठी चिमुकल्यांना खोकल्याचं औषध देणं जीवघेणं ठरु शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालकांनीही बालकांना औषधं देऊ नयेत. अन्यथा चिमुकल्यांचा जीव जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT