New COVID variant in India latest news : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता वाढली आहे. आंध्र प्रदेशच्या कडापामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मासापेटा येथील एका ४६ वर्षांचया कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णावर करण्यात आलेले अँटीबायोटिक्स उपचार पूर्णपणे अपयशी ठरले. या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
औषधांना दाद न देणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबतची (व्हेरिएंटची) चिंता आणखी वाढली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या मृत्यूनंतर निर्जंतुकीकरण आणि संपर्क शोध यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अँटीबायोटिक्सने उपचार करूनही लक्षणे नियंत्रणात न आल्याने चार दिवसांनी ४६ वर्षीय व्यक्तीचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते. त्याला धाप लागत होती, त्याशिवाय अति प्रमाणात खोकला येत होता. ४ दिवसांपूर्वी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्हा आरोग्य अधिकारी रवी बाबू यांनी सांगितले. एक्स-रे तपासणीत मृत व्यक्तीची दोन्ही फुफ्फुसे पूर्णपणे खराब झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे न्यूमोनिया झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
४ दिवस उच्च डोसच्या अँटीबायोटिक उपचारांनंतरही आजार कमी झाला नाही, त्यामुळे डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आला, असे ते म्हणाले. त्यानंतर छातीच्या सीटी स्कॅनमध्ये कोविड-१९ संसर्गाची पुष्टी झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, निर्जंतुकीकरण आणि मृत व्यक्तीच्या प्राथमिक व दुय्यम संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.