Corona Virus: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगभराची चिंता वाढवली असून सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. भारतातही केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाने चीन आणि अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये सध्या कोरोना प्रादुर्भावाने मृत्यूचे तांडव सुरू झाले असून चीनपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चीन आणि अमेरिकेनंतर आता प्राणघातक कोरोना (Corona) विषाणूने जपानमध्ये कहर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोविडच्या वाढत्या प्रकरणांनी सरकारची चिंता वाढवली आहे. आकडेवारीचा अभ्यास करणार्या वर्ल्डोमीटर या वेबसाइटनुसार, काल जगात 1374 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मोठी गोष्ट म्हणजे काल ज्या देशात सर्वाधिक मृत्यू झाले ते चीन किंवा अमेरिका नसून जपान आहे. काल जपानमध्ये कोरोनामुळे ३३९ लोकांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कालच्या दिवशी, जपानमध्ये (Japan) 339 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेत 289, ब्राझीलमध्ये 165, फ्रान्समध्ये 120 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साई बाबा संस्थान, तसेच तुळजापुरच्या अंबाबाई मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.