Corona Variant JN.1 Cases  Saam Tv
देश विदेश

Corona Variant JN.1 Cases : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, घराबाहेर पडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला वाचा

Corona Virus News: सिंधुदुर्गामध्ये जे-१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शनचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Coronavirus New Variant

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा भारतात एन्ट्री केली आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.

सिंधुदुर्गामध्ये जे-१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शनचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या काही दिवसांपासून २९२ प्रकरणे केरळमध्ये आढळून आले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटवर संशोधन सुरु आहे. गोव्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर केरळ आणि महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळला आहे.

1. कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत अलर्ट

सफदरजंग रुग्णालयाचे डॉ. रोहित कुमार म्हणाले की, कोरोना हा आरएनए विषाणू असून त्याचे अनेक व्हेरिएंट समोर येत आहे. दिल्लीमध्ये सध्यातरी एकही रुग्ण सापडलेला नाही. परंतु, याचा धोका पसरु नये म्हणून आरोग्यविभाग आणि प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे.

2. घराबाहेर पडण्यापूर्वी डॉक्टरांनी दिला सल्ला

डॉक्टरांनी सांगितले की, जर कुणालाही सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि दमा असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. तसेच मधुमेह (Diabetes) आणि हृदयाच्या संबंधीत आजार (Disease) असणाऱ्या लोकांनीही काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT