Coronavirus Travel Update News In Marathi SAAM TV
देश विदेश

मास्क नसेल तर विमान प्रवास करू दिला जाणार नाही; काय आहेत नवीन गाइडलाइन्स?

मास्क नसेल तर विमान प्रवास करू दिला जाणार नाही. डीजीसीएने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

साम ब्युरो

नवी दिल्ली: तु्म्ही नियमित विमान प्रवास करत असाल तर, सतर्क व्हा! कारण आता तोंडावर मास्क लावला नसेल तर, विमानतळावर (Airport) प्रवेश करण्यापासून रोखण्यात येईल. तसेच विमान प्रवास करू दिला जाणार नाही. नागरी उड्डाण संचालनालयानं (DGCA) विमानतळ आणि विमान प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

नव्या नियमांनुसार, विमानतळ आणि विमान प्रवासादरम्यान मास्कसंबंधी नियमांत कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. मागील आठवड्यात हायकोर्टानं फटकारल्यानं डीजीसीएने नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) प्रसिद्ध केल्या आहेत.

डीजीसीएने बुधवारी सांगितले की, 'विमानतळे आणि विमान प्रवासादरम्यान मास्क लावला नसेल तर, ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल. त्याचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना विमानतळांवरूनच परत पाठवले जाईल.' एखाद्या प्रवाशाने मास्क लावण्यास वारंवार नकार दिला आणि कोविड नियमांचे पालन केले नाही तर, त्यांना उड्डाणापूर्वीच विमानातून उतरवण्यात येईल, असेही डीजीसीएने म्हटले आहे.

डीजीसीएच्या माहितीनुसार, नियमांचे पालन (Covid Rules) न झाल्यास करण्यात येणाऱ्या कारवाई अंतर्गत संबंधित प्रवाशांना सीआयएसएफच्या ताब्यात दिले जाईल. तसेच संबंधित प्रवाशांना दंडही आकारला जाईल. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर विमानतळे आणि विमानांमध्ये प्रवासादरम्यान मास्क वापरण्यासंबंधी नियमांत शिथिलता देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा विमानतळे आणि विमानात प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT