Corona JN.1 Variant News Symptons  Saam TV
देश विदेश

Corona JN.1 Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1च्या रुग्णसंख्येत वाढ, दोन नवीन लक्षणे आली समोर

Corona JN.1 Variant New Symptons : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1ची आणकी दोन लक्षणे समोर आली आहे. नवीन लक्षणांमध्ये झोपेचा त्रास होणे आणि चिंता वाढणे यांचा समावेश आहे.

प्रविण वाकचौरे

Corona Jn.1 Variant :

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1ने नागरिकांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये कोरोनच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचाही समावेश आहे. नव्या व्हेरिएंच प्रसार वेगाने होत असल्याने सरकार देखील अलर्ट मोडवर आहे. मात्र आता सर्वांचीची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1ची आणकी दोन लक्षणे समोर आली आहे. नवीन लक्षणांमध्ये झोपेचा त्रास होणे आणि चिंता वाढणे यांचा समावेश आहे. यूके ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने डिसेंबर २०२३ मध्ये या लक्षणांचा माहिती दिली होती. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या.

JN.1ची इतर लक्षणे?

  • कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्यास तुम्हाला सर्दी-ताप ही लक्षणे दिसू शकतात.

  • खोकला, डोकेदुखी, अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे देखील दिसतात.

  • स्नायू दुखणे, घसा खवखवणे यासारखी लक्षणे देखील दिसतात.

काय काळजी घ्याल?

कोविडपासून बचाव करण्यासाठी वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, शारीरिक अंतर ठेवा आणि गाईडलाईन्सचे पालन करा. चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा, विशेषत: डोळे, नाक आणि तोंड. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून घ्या. अस्वस्थ वाटत असताना घरीच रहा आणि इतरांनाही तसेच सांगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT