JN.1 Variant Cases saam tv
देश विदेश

JN.1 Variant News: सावधान! कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरतोय; कोणत्या राज्यात किती रुग्ण? जाणून घ्या...

JN.1 Variant Cases: जेएन.१ व्हेरिएंटचे कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळून आलेत? जाणून घेऊयात...

Satish Daud

JN.1 Covid Variant in India

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला असं म्हणता-म्हणता देशात आणखी एका नव्या व्हेरिएंटने एन्ट्री केली. मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या रुग्णांची एकूण संख्या १९६ इतकी झाली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल १० राज्यांमध्ये या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, जेएन.१ व्हेरिएंटचे कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळून आलेत? जाणून घेऊयात... (Latest Marathi News)

आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९ राज्यात कोरोनाच्या व्हेरिएंटने शिरकाव केला होता. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ओडिशात देखील या व्हायरसने एन्ट्री केली आहे. जिथे JN.1 प्रकरणे आढळली आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

देशात सर्वप्रथम जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर इथे झपाट्याने प्रसार झाला. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत जेएन.१ व्हेरिएंटने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ८३ वर पोहचली आहे.

गोवा, गुजरातमध्येही रुग्णसंख्या अधिक

केरळनंतर देशात सर्वाधिक रुग्ण गोव्यात आढळले आहेत. गोव्यात जेएन.१ व्हेरिएंटचे ५१ सक्रिय रुग्ण आहेत. गुजरातमध्ये ही रुग्णसंख्या ३४ इतकी आहे. तर कर्नाटक ८ रुग्ण, महाराष्ट्रात ९, राजस्थानमध्ये ५, तामिळनाडूमध्ये ४, तेलंगणात २ आणि ओडिशा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहेत. सोमवारी दिवसभरात देशात कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबादितांची एकूण सक्रिय संख्या ४,३९४ झाली आहे. तसेच, आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT